💥धारासुर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत जवळा रु येथे जनावरांच्या लंपी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद...!


💥या लसीकरण मोहीमेत १९० जनावरांना लंपी स्क्रीन हा आजार होऊ नये म्हणून लस देण्यात आली💥

गंगाखेड प्रतिनिधी/ मौजे जवळा रु ता. गंगाखेड  येथे धारासुर पशुवैद्यकीय  दवाखान्याच्या अंतर्गत आज मंगळवार दि.२७ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी  जनावरांना लंपी स्क्रीन आजारच्या नियंत्रणासाठी मोफत लसीकरण योजना राबविण्यात आली होती. गाय बैल यांच्या अंगावररील चमड्यांना संसर्गजन्य रोग तथा लंपी स्क्रीन आजाराने काही भागांमध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. 

त्यामुळे आपल्या जनावरांना लंपी स्क्रीन आजार होऊ नये. यासाठी लस घेण्यासाठी सकाळी ९:०० वाजल्यापासून पशुपालकांनी मोठी गर्दी केली होती. पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी डॉ. शिरसाट मॅडम  तसेच डॉ. स्वामी,हनुमान आव्हाड, अधिकारी कर्मचाऱ्यांनी जवळपास १९० जनावरांना लंपी स्क्रीन हा आजार होऊ नये म्हणून  लस देण्यात आली. यावेळी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील पशुपालक राजेभाऊ कदम, नाथराव कदम, अंकुश कदम, लक्ष्मण कदम,  कृषी मित्र ज्ञानोबा कदम, जगन्नाथ कदम चेअरमन आदींनी परिश्रम घेतले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या