💥पुर्णेत लेखक दिपक पुर्णेकर लिखीत 'कोलदांडा' या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न...!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीनजी चंदनशिवे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 

पूर्णा (दि.१४ सप्टेंबर)  शहरातील युवा कवी/लेखक दिपक पुर्णेकर लिखित 'कोलदांडा' या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील गोंधळसम्राट राजारामबापू सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


 या प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीनजी चंदनशिवे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दादाराव पंडित व स्वागताध्यक्ष विनोद गायकवाड यांचीही विशेष उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्ते मास्टर अनिल कांबळे,प्रा.घोडे,बंडु गायकवाड, विजय गायकवाड,शिवा देवणे,विजय सातोरे,मगदुम कुरेशी,रौफ कुरेशी,मिलींद सोनकांबळे,संजय शिंदे,गाझी सलमान,रवि गायकवाड, तुषार गायकवाड,अनिल नरवाडे,रामा जाधव,मिलिंद वाघमारे,मोहन आडबाल, आदींची प्रमुख उपस्थितीही होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोलदांडा कथासंग्रहाचे लेखक दिपक पुर्णेकर यांनी केले. तर शुभेच्छापर भाषणामध्ये उद्घाटक संतोषअण्णा एकलारे, दादारावजी पंडित, मास्टर अनिल कांबळे, विनोदभाऊ गायकवाड , यांनी आपले मत व्यक्त करून कोलदांडा कथा संग्रहास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये विद्रोही कवी दंगलकार नितीनजी चंदनशिवे यांनी सखोल असे मार्गदर्शन करून त्यांच्या काही कवितांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नितीनजी नरवाडे सर यांनी केले. नागसेन जमधाडे, सचिन गायकवाड, आकाश गायकवाड, श्याम खंदारे, उमाकांत गायकवाड, सुमित चावरे, मनोज उबाळे, अमित चावरे आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी शहरातील बहुसंख्य साहित्यप्रेमींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या