💥परभणी जिल्ह्यात शेतपिकांच्या नुकसानी बाबत वैयक्तिक तक्रार करण्यासाठी पीएमएफबीवाय मध्ये पावसाचा खंड पर्याय उपलब्ध द्या...!


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कडे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी केली मागणी💥

परभणी (दि.०५ सप्टेंबर) - संपूर्ण जिल्हात पावसाच्या खंडा मुळे झालेल्या शेती पिकाची नुकसानी बाबत वैयक्तिक तक्रार करण्यासाठी पीएमएफबीवाय मध्ये पावसाचा खंड पर्याय उपलब्ध नसून तो त्वरीत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी केली आहे.

                खरीप 2022 मध्ये सुरुवातीला सततचा पाऊस झाल्यामुळे पिक कमकुवत होते.मागील बऱ्याच दिवसांपासून पावसाने खंड दिल्यामुळे शेतातील पीक वाळून जात आहेत.अशा परिस्थितीत परभणी जिल्ह्यातील पिकविमा धारक शेतकरी पिकविमाच्या वैयक्तिक तक्रारी क्रॉप इन्शुरन्स ॲप,क्रॉप इन्शुरन्स ई-मेल किंवा टोल फ्री नंबरवर करण्याचा प्रयत्न करत आहेत पिकाच्या नुकसानीचे कारण निवडण्यासाठी 15 पर्याय क्रॉप इन्शुरन्स अँपमध्ये  उपलब्ध आहेत.पण या 15 कारणांमधये  पावसाचा खंड अर्थात ड्रायस्पेल हा पर्याय उपलब्ध नाही.त्यामुळे शेतकरी दुष्काळ हा पर्याय निवडण्याची शक्यता आहे.मागील तीन वर्षाचा अनुभव पाहता जोपर्यंत शासन अधिकृतरित्या दुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत कंपनी दुष्काळ करणाने केलेली तक्रार पिक विमा परतावा देण्यासाठी ग्राह्य धरत नाही शासन दुष्काळ जाहीर करेल, करणार का नाही याविषयी अजून शासनाचे कोणतेही धोरण स्पष्ट नाही. या विषयात शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन पिक विमा कंपनीने संयुक्तरित्या प्रेस नोट  काढून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी  आज भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा ग्रामीण केली आहे.तसेंच या परिस्थिती मध्ये पीक विम्याची वैयक्तिक तक्रार करताना पावसाचा खंड अर्थात ड्राम स्पेल  हा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी भाजपच्या वतीने डॉ. सुभाष कदम यांनी केली आहे.यावेळी भाजपाचे प्रभाकर लोखंडे दुसलगाव चे सरपंच पांडुरंग शेतकरी पिक विमा चळवळीचे मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे व शेतकरी संघटनेचे विश्वंभरराव गोरवे उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या