💥पुर्णा तालुक्यात श्री.गणेश महोत्सवाला उत्साहात सुरुवात : शहरात ३५ तर ग्रामीण भागात ६५ गणेश मंडळांनी केली स्थापना...!

 


💥तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत ७३ गणपतींची स्थापना तर ताडकळस हद्दीत ८० गणपतींंची स्थापणा💥


पुर्णा (दि.०१ सप्टेंबर) - राज्यासह देशात पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी म्हणून सन २०२०/२१ या दोन वर्षी प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातल्यामुळे गणेश महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नाही परंतु यावर्षी मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी सार्वजनिक गणेश महोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रमांवरील बंदी उठवल्यामुळे परभणी जिल्ह्यासह पुर्णा तालुक्यात देखील मोठ्या उत्साहाने दि.३१ आगष्ट २०२२ पासून श्री गणेश महोत्सवाला सुरूवात झाली असून शहरासह तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात श्री.गणपती बाप्पांची ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात वाजत गाजत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.


पुर्णा शहरात सार्वजनिक गणपती मंडळांकडून ३५ गणपतींची स्थापना करण्यात आली तर पुर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत तालुक्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक गणेश मंडळांकडून ६५ गणपतींची स्थापना करण्यात आली असून पूर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दी मधील एक गावात एक गणपती असे मिळून ०७ गावामध्ये 'एक गाव एक गणपती' अंतर्गत तालुक्यातील माटेगाव,कातनेश्वर,लक्ष्मी नगर,बरबडी,वडगाव,इस्माईलपुर,संदलापूर या गावांतील गावकरी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत गावात एकत्रित येवून एकच सार्वजनिक गणपती मंडळाची स्थापणा श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे या सात गावातील गावकरी मंडळींचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड मार्गावरील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एकूण ७३ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असून यात चुडावा येथे ०५ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असून चुडावा पौलिस स्थानकाच्या हद्दीतील गावांमध्ये एकूण ६८ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असून यात 'एक गाव एक गणपती'अंतर्गत १३ गावातील गावकऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत गावात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. 

पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत देखील सर्वत्र श्री गणपती महोत्सवाला उत्साहाने सुरूवात झाली असून ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत एकून ८० सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असून यात 'एक गाव एक गणपती अंतर्गत' तब्बल २५ गावातील गावकरी मंडळींनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली असून यात ताडकळस गावात १२ सार्वजनिक गणेश मंडळांनी तर ग्रामीण भागात ६८ गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. मूर्तीची स्थापना करण्यात आली असून यातील ३७ गणेश मंडळ परवाना धारक असून उर्वरीत ४३ गणेश मंडळांनी अद्यापही परवाने घेतलेले नाही एकदंर संपूर्ण पुर्णा तालुक्यात अत्यंत शांततेत श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून श्री गणेश महोत्सव शांततेत व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडावा याकरिता जागोजाग पोलिस बंदोबस्त दिला असून पोलिस प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी स्वतः प्रत्येक गणेश मंडळांना भेटी देवून गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना  नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देतांना पाहावयास मिळत आहेत.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या