💥नांदेड गुरूद्वारा बोर्डाच्या इमारतींचा कोविड-19 संक्रमण काळामध्ये विलगीकरण केंद्रासाठी वापर : भाडे थकीत ...!


💥एनआरआर यात्री निवास/पंजाब भवनच्या खोल्यांचे भाडे तात्काळ अदा करा : मनपा आयुक्तांकडे शिख समाजाने केली मागणी💥 

नांदेड (दि.27 सप्टेंबर) - कोविड-19 काळात गुरूद्वारा बोर्डाच्या मालकीच्या एन.आर.आय. यात्री निवास येथील 145 खोल्या आणि पंजाब भवन येथील यात्री निवासच्या 150 खोल्या कोविड रूग्णांसाठी वापरण्यात आलेल्या खोल्यांचे भाडे लवकरात लवकर देण्यात यावे, या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना शीख समाजाच्या शिष्ट मंडळाने दिले.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, यात्री निवास येथील 145 खोल्या आणि पंजाब भवन येथील यात्री निवासच्या 150 खोल्या यांचे भाडे 4 कोटी,76,लक्ष 13,हजार 680/- रूपये तसेच कोविड सेंटर बंद झाल्यानंतर खोल्यांमधील गाद्या, उशी, बेडशीट फार खराब झाले होते व दोन्ही यात्री निवासची रंगरंगोटी करण्यात आली, त्यास एकूण खर्च 2,कोटी 02लक्ष,31,044/- रूपये आला. ही सर्व रक्कम महानगरपालिकेकडून मिळावी, यासाठी गुरूद्वारा बोर्डाच्या वतीने अनेकवेळा अर्ज केले, परंतु महापालिकेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

तरी महापालिकेने गुरूद्वारा बोर्डाचे अंदाजे 7 कोटी रूपये तात्काळ द्यावेत, अन्यथा शीख समाींजाच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर स.अवतारसिंघ पहरेदार, स.मनबीरसिंघ ग्रंथी, स.किरपालसिंघ हजुरीया, स.मनप्रितसिंघ कारागीर, स. प्रिंतपालसिंघ शाहू, स.हरजीतसिंघ पदम, स.केरसिंघ खालसा, स.नवज्योतसिंघ पहरेदार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या