💥हैदराबाद मुक्तिसंग्राम अंतर्गत मराठवाडा मुक्तिसंग्राम 17 सप्टेंबर 1948 हा मंगल स्वातंत्र्यदिन.....!



💥महान स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला साष्टांग दंडवत💥

 या पृथ्वीवर मानवासाठी सर्वात अनमोल अशी कुठली गोष्ट असेल तर ते आहे स्वातंत्र्य, स्वातंत्र्यासाठी फार मोठी किंमत आपल्या पूर्वजांनी मोजली किंवा मोजलेली असते तेव्हा आपल्याला स्वातंत्र्याचा खरा आनंद घेता येतो.

" भारताच्या त्याचा मध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम मराठवाडा मुक्ती संग्राम याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण लाखो लोकांनी आपले हुतात्मे दिले, स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावले, प्राणार्पण केले. तेही शे-दोनशे वर्ष नाही तर तब्बल 700 चाळीस वर्ष पारतंत्र्यात राहून आपला धर्म आपली संस्कृती जिवंत ठेवत, स्वातंत्र्य मिळवणे तोंडचा खेळ नव्हे. दुःखदायी गोष्ट अशी की मराठवाड्यातल्या स्वातंत्र्य संग्रामाचा किंवा त्याच्या शेकडो वर्षाच्या गुलामी विरुद्धच्या महान युद्धाचा उल्लेख महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शोधूनही सापडत नाही. निजामशाही मधे रजाकारी अत्याचाराला कोणतीच सीमा उरली नव्हती. अत्यंत क्रूरपणे माणुसकी मानवता पायदळी तुडवत माणसांचा नरसंहार सुरू झाला होता. ही संख्या सांगितली जाते ती खरी नाही. असे मी अभ्यासांती निष्कर्षाला पोचलो आहे. इतिहासाचे लिखाण करत असताना कोणी सुखावेल अथवा पुणे दुखावेल असे समजून जर लिहायला लागले ते इतिहास समाजाचे वाटोळे करतो एवढे नक्की. ज्या सत्ताधाऱ्यांच्या इच्छेवर त्यांच्या कलेने त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनातून जमा लिहिला जातो तेव्हा इतिहासाचे खरे वाटोळे होते .व समाजाला दिशा मिळते आणि समाजवादाचा इतिहास हरवून बसतो. हैदराबाद मुक्तिसंग्राम मध्ये निजामशाहीच्या विरुद्ध मराठवाडा तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग , विदर्भ व खानदेशातील काही भाग इथल्या गावा गावातील लोकांनी रजा करा विरुद्ध आपले प्रतिकाराचे सर्वोच्च टोक गाठले प्रसंगी लाखो लोकांनी बलिदानही स्वीकारले. त्यांना आपण स्वातंत्र्य संग्रामातील महान स्वातंत्र्य सेनानी म्हणून  ओळखतो ,आदर करतो. मराठवाड्यातील तर गावागावांमध्ये लढा याची वर्णनं तुम्हाला आजही सांगणारी माणसं जिवंत आहेत हे सौभाग्याचे लक्षण आहे परंतु त्याला लिहून ठेवण्याचे काम आपण करू शकत नाही हे दुर्दैव आहे. मराठवाड्यातील तरुण मित्रांना माझी विनंती आहे तुमच्या गावात घडलेल्या छोट्या-मोठ्या सर्व संघर्षाची कथा जुन्या लोकांनी जे तुम्हाला सांगितली आहे ती शब्दबद्ध करा तो आपला इतिहास आहे तो या मातीचा सुगंध आहे. तिथल्या परी दानाचा तो परिचय आहे. हे त्या बहादुरी चा तो खरा इतिहास आहे. मराठवाड्यातील लोकांबरोबरच का दुःखाचे दिवस विदर्भ व खानदेशातील सीमेवर असलेल्या लोकांनी सोसले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम मध्ये खान्देश आणि विदर्भाचा प्रचंड मोठा वाटा आहे. कधीही कुणीही विसरू नये. निजामशाहीच्या विरुद्धचे सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रशिक्षण केंद्र विदर्भ आणि खानदेशाच्या सीमेलगतच्या प्रदेशामध्ये होते. याप्रसंगी विदर्भ आणि खानदेशातील मायबाप जनतेचे आम्ही जाहीर आभार मानतो. चे ऐतिहासिक आभारही मानतो. विदर्भ आणि खानदेशातील बांधवांच्या मदतीशिवाय हा लढा चालवणे थोडे कठीणच होते. मराठवाडा मुक्तिसंग्राम हैदराबाद मुक्तिसंग्राम हा सुवर्णाक्षरांनी लिहावा असा शस्त्र क्रांतीकारांचा प्रचंड मोठा ऐतिहासिक इतिहास दडपण्यात आला आहे असे माझे स्पष्ट मत आहे. मला विदर्भ मराठवाडा खानदेश या भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर करण्याची संधी मिळाली त्यामुळे कोणत्या गावात कोणता लढा लढला गेला .याची टिपण लिहिण्यासाठी लिहून ठेवण्यासाठी मदत झाली. माझ्या  प्रकाशित झालेल्या, गोफणगुंडा, भाग 1 पुस्तकामध्ये रजाकार किती लहरी किती क्रूर आणि किती भयावह होते याचा उल्लेख मी पदोपदी केला आहे. मराठवाड्यातल्या माणसांचा लढा हा किती मोठा आणि किती किती त्यागाचा होता. ज्यांचे इतिहासामध्ये सर्व परिचित असेच नाव आहेत त्यांना तर मी दंडवत घालतोच परंतु ज्यांनी स्वतःला अक्षरही राहता येत नाही अशा अज्ञानी लोकांनी प्रचंड मोठा इतिहास घडवला  या महान  अज्ञात स्वातंत्र्य सेनानी यांचा कुठे उल्लेखही केला गेला नाही. the untold stories of real freedom fighters is missing somewhere. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे मुकुटमणी स्वामी रामानंद तीर्थ  हे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे जनक. त्यांच्याबरोबर कार्यरत राहणारे आम्हाला स्वातंत्र्यसैनिकांचा मराठवाड्यात तुम्हाला कुठेही लवकर पुतळा दिसणार नाही. मराठवाड्याचा इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे काम नव्या पिढीने हातात घ्यावे असे मला वाटते. ग्रामीण भागामध्ये आपापल्या गावातील रजाकरा विरुद्ध निजामाविरुद्ध लढल्या गेलेल्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणभेरी चे वर्णन शब्दांमध्ये प्रत्येक युवकाने करून ठेवले तर मराठवाड्याचा स्वतंत्र इतिहास निर्माण होईल. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांना ज्ञात-अज्ञात सर्वात महान आत्म्यांना मनापासून साष्टांग दंडवत घालून धन्यवाद व्यक्त करतो. कारण या महान स्वातंत्र्य  सेनानींच्या बलिदानामुळे आज आपल्याला 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळवून आज आपण  या मंगल दिनाला आदरणीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत. हे आपल्या पिढीचे भाग्य आहे. खरेतर परभणी चे सुपुत्र थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय आर.डी. देशमुख साहेब व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवाकर रावते साहेब यांचे आम्ही ऋणी आहोत. यांच्या अथक प्रयत्नांमुळे फायदेशीर लढाईमुळे व वैचारिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ व विशाल दृष्टीमुळे मराठवाड्याला मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन प्राप्त झाला.

 शिवशाही मध्ये  त्याकाळी मंत्रिमंडळात असलेले आदरणीय नामदार दिवाकर रावते साहेबांच्या शासकीय व प्रशासकीय हालचालीमुळे व अथक प्रयत्नांमुळे शासनानेही 17 सप्टेंबर 1948  हा मंगल स्वातंत्र्यदिन राज्य शासनाने  सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला. त्यास प्रशासकीय मान्यता ही मिळवून दिली. मराठवाड्याच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये आमदार दिवाकर रावते यांचा अभ्यास प्रचंड वरच्या पातळीत आहे हे सांगणे न लागे. मराठवाड्यातील प्रत्येक गावांमध्ये साहेबांनी प्रत्यक्ष भेट देत असताना त्या गावचा इतिहास  जाणून घेत मराठवाड्यातल्या मातीच्या त्यागाचा सुगंध जाणून घेतला त्याचा मी साक्षीदार आहे. शासनव्यवस्थेतील नामदार दिवाकर रावते हे एक असे व्यक्तिमत्व की ज्यांना मराठवाड्याच्या महान संस्कृतीबद्दल स्वातंत्र्यसंग्रामात बद्दल प्रचंड अभिमान व स्वाभिमान आहे. मंत्री असताना ते एक दिवस अगोदर येऊन  17 सप्टेंबर 1948 हा स्वातंत्र्यदिन मराठवाड्यामध्ये साजरा कसा चांगल्या पद्धतीने होईल याची काळजी  घेत असत. 740 वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या महान मायबाप जनतेने दिलेला लढा इतिहासात दुसरा सापडेल असे मला वाटत नाही. पण तु इतिहासामध्ये याचे आकलन व्यवस्थित झाले असते तर आणखी बरे वाटले असते एवढेच या क्षणी वाट सांगावेसे वाटते. मराठवाड्याच्या या मातीत जन्म घेण्याचे भाग्य मला लाभले म्हणून मी मराठवाडा स्वातंत्र्य संग्राम हैदराबाद मुक्तिसंग्राम याबद्दल एक नवीन पुस्तक घेऊन पुढच्या दोन महिन्याच्या आत आपल्या समोर येण्याची इच्छा बाळगतो. तसे काम चालू असून आपण त्या कामी आशीर्वाद द्यावे. धन्यवाद.. भावनांचा स्वीकार व्हावा.

 क्रमशः...  लेखक: सतीश सातोनकर, परभणी.

जय मराठवाडा ,जय मराठवाडा मुक्ती संग्राम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या