💥जिंतूर येथे अमृत महोत्सवानिमित्त तहसील व नगर परिषद कार्यालयाकडून सामूहिक राष्ट्रगीतांचा कार्यक्रम संपन्न....!


💥यावेळी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षक वृंद, कर्मचारी व शहरातील नागरिक,पत्रकार उपस्थित होते💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.०९ आगस्ट) - आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर तहसील कार्यालय व न.प.च्या वतीने जिल्हा परिषद शाळा मैदानावर अमृत महोत्सवानिमित्त सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.


त्यास शहरातील सर्व शाळा व  महाविद्यालयातील शिक्षक वृंद, कर्मचारी व शहरातील नागरिक, पत्रकार, उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमांकाचे प्रास्ताविक केले.

यावेळी स्टेजवर तहसीलदार मांडवगडे, जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, ना. तहसीलदार परेश चौधरी , गटशिक्षणाधिकारी गांजरे, अहेमद सिद्धीकी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद लहाने व सिद्धेश्वर शाळेचे मुख्याध्यापक  उपेंद्र दुधगावकर,दहीभाते सर आदी मान्यवर उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या