💥बंजारा समाजाच्या तीज उत्सवाची ८० वर्षानंतर यशस्वी सांगता.....!


💥सोनापूर तांड्यात तीज उत्सवाची शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता💥

जिंतूर प्रतिनीधी बिग.डी.रामपूरकर

जिंतूर : बंजारा समाजाची संस्कृती आणि सण हे इतरांच्या पेक्षा  वेगळया पध्दतीने मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतात. त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे तीज उत्सव होय. प्राचीन काळापासून श्रावण महिन्यातील रक्षाबंधन झाल्यावर या सणाला सुरुवात होते. हा सण नऊ दिवस वैविध्यपूर्ण पध्दतीने आपली संस्कृती जतन करून साजरा करण्यात येतो. तीज हा सण प्रामुख्याने बंजारा समाजातील अविवाहित मुली स्त्रिया आणि मुले यांच्या करीता आनंदाची पर्वणीच असते. तीज उत्सव सुरू होण्यापूर्वी तांडयातील नायक कारभारी यांची परवानगी घेतली जाते. अगोदरच्या रात्री गहु भिजवून पहिल्या दिवशी तीज ची सुरुवात करण्यासाठी आवश्यक वारुळाची माती बोराच्या फांद्या घेण्यासाठी गावातील सर्व मुली पारंपरिक बंजारा तीज गीत दफडी च्या तालावर नाचत गाने म्हणत जातात. ( म्ह धूड मंगाई सोना नगरी ती ) नंतर तांडयातील सेवालाल महाराज मंदिर किंवा याडी जंगदबा माता मंदिर येथे हाताने विणकाम करुन सजवलेल्या टोपलीत तीज पेरणी करतात. या तीज ची खुपच काळजी घेतली जाते. त्याच सोबत  राजी बंजारा समाजाची संस्कृती व ऐतिहासिक तसेच भविष्यात तांडयाचे रक्षण व्हावे म्हणून गाणी म्हणत सामुहिक नृत्य सादर करण्यात येते. हा सन बंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावर मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसून येतो शेवटच्या दिवशी नवमीला सामूहिक भंडारा करण्यात येतो त्या दिवशी तांड्यावर एक मोठा आनंददायी अनुभव पाहायला मिळतो नंतर नायकाची परवानगीनेच तिचे तांड्या शेजारच्या नदीत किंवा तलावात विसर्जन करण्यात येते या २१व्या शतकात सुद्धा आपली प्राचीन संस्कृती जतन करताना बंजारा समाज आपल्याला दिसून येतो.

💥सोनापूर तांड्यात तीज उत्सवाची शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता..!       

         बंजारा समाज हा निसर्गाला पुजणारा समाज आहे. त्याचच एक उदाहरण म्हणजे बंजारा संस्कृतीमधील जुनी परंपरा म्हणजे बंजारा तिज. जरी करता तीज ही संस्कृती लोकांना विसर पडली होती परंतु आता ती नव्याने आणि नव्या उल्हासाने पुन्हा जागृत झाली आहे. जिंतूर मधील सोनापूर नगरीत ८0 वर्षानंतर प्रथमच तिज पेरण्यात आले. गोर सेना शाखा सोनापुर याच्या अखंड प्रयत्नाने आणि उल्हासाने हे शंभव झाले आहे. सोनापुर नगरीतील तरुणांच्या उल्हासाने आणि गावातील नायक, कारभारी आणि प्रतिष्ठित लोकांच्या मार्गदर्शनाखाली तिज महोत्सव पार पाडण्यात आले. सोनापुर तांडा येथे दि.१३ रोजी  तिज पेरण्यात आले होते. दि.२३ ला तिज सांगता करण्यात आली. तिज समाप्ती वेळी  गावातील जवळपास दीड दोन हजार गावकरी आणि पाहुने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोर सेना सोबती जगदीश भीया  राठोड आणि गोर सेना टीम जिंतूर उपस्थित होती. बामणी गावातून आलेल्या महिला मंडळ यांनी सुद्धा कार्यक्रमाची सोभा वाढवली .

बंजारा तिज गीत     

'म घंउला मंगाई हड्प्पातीम धूडे 

मंगाई सिंदू नगरीती,

समोर एक पारंपारीक गित सांगते

केरे तांडेम वाजोये सोनकी

मोहना रो दळ बिजेगो.

बापूरे तांडेम वाजोये सोनकी

मोहना रो दळ बिजेगो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या