💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा....!

                    


💥यावेळी शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय आवरगंड यांच्या हस्ते संपन्न झाले💥


पुर्णा (दि.१७ आगस्ट) - तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावा निमीत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.सुरूवातीला ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच गोविंद आवरगंड यांच्या हस्ते संपन्न झाले. 

   यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी जगदाळे,सतिश कानेगावकर चंद्रशेखर आंबोरे बाळासाहेब लहमागे अमित पाचकोर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शेक्षणीक साहीत्य वह्या रजिस्टर चित्रकला पेन पेन्सिल असे एकुण ११ हजार रूपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .संजय आवरगंड यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक संजयकुमार जोशी यांनी शाळेच्या समस्या व शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने केलेल्या प्रगती विषयी महाजन सर यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर वर्ग पहिल्याच्या विद्यार्थ्यापासून वर्ग 8 वी च्या विद्यार्थ्यानी अतिशय उत्कृष्ट भाषणे केली.त्यामध्ये त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी कशाप्रकारे आपल्या प्राणाचे बलीदान देऊन देश स्वातंत्र्यासाठी मेहनत घेतली याचे वर्णन केले.त्यानंतर एन.एम.एम.एस परीक्षेत उत्तीर्ण  विद्यार्थी  कु, गायत्री आवरगंड सानीका आवरगंड आरती आबोरे पवन आवरगंड या चार मुलाचा सत्कार केला व त्यांच्या पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचा चादाजी आवरगंड अनुरथ आवरगंड यांच्या हस्ते.शेळके सर  सुरज.पौळ सर यांचा सत्कार करण्यात आला.माझे गाव माझी शाळा ग्रुप तयार केल्या बदल गोविंद पोळ यांचा सत्कार करण्यात आला प्रगतीशील शेतकरी  जनार्धन आवरगंड यांनी शाळा व गावाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांपैकी बाळासाहेब.लहमागे सरांनी मुलांचे कौतुक केले.सुंदर अश्या कार्यक्रमाचे सर्वांना खिळवून ठेवणारे सुत्रसंचालन गजानन पवार सर यांनी केले ,तर आभार प्रदर्शन .ढगे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी .पौळ सर,शेळके सर,महाजन सर ,सौ.झटे मँडम यांनी परीश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या