💥परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातील मौजे डाकुपिंपरी येथील अवैध रेती साठ्याचा जाहीर लिलाव....!


💥लिलावात सहभाग घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले💥

परभणी,(दि.08 आगस्ट) : पाथरी तालुक्यातील मौजे डाकुपिंपरी येथील जप्त अवैध रेतीसाठा अंदाजे 60  ब्रास असून डाकुपिंपरी येथे आहे. तरी या रेतीसाठ्याचा लिलाव बुधवार दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छुकांनी जाहीर लिलावात सहभाग घ्यावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

            जप्त वाळु साठ्यासाठी वाळु लिलावात भाग घ्यावयाच्या व्यक्तींना दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता अटी व शर्तीच्या अधीन राहुन लिलावात बोली बोलता येईल. लिलाव धारकाकडून सरकारी किमतीच्या एक चतुर्थांस रक्कम लिलाव होण्यापुर्वी घेण्यात येईल. लिलाव झालेल्या दिवशी लिलावधारकाने अंतीम केलेली संपुर्ण रक्कम भरावी लागेल. लिलाव धारकास रेतीसाठा 40 ब्रास करीता 1 दिवस या प्रमाणात त्यांच्या स्वखर्चाने साठवणूक केलेल्या ठिकाणावरुन उचल करणे बंधनकारक राहील. सदरील लिलाव रद्द करणे किंवा पुर्ण रद्द करणे, काही कारणास्तव त्या बदल करणे इत्यादी अधिकारी उपविभागीय अधिकारी, पाथरी यांनी राखुन ठेवले आहे. असे  उपविभागीय अधिकारी, पाथरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या