💥जिंतूर तालुक्यातील आडगांव परीसरातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कडून पाहणी...!


💥आमदार सौ.मेघना बोर्डीकर यांनी आज सोमवार दि.०८ रोजी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली💥

जिंतूर  प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०८ आगस्ट) - तालुक्यातील आडगांव व परीसरात 7 ऑगस्ट रोजी अतिशय जोरदार अतिवृष्टी झाल्याने परीसरातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले याची माहिती मिळताच आमदार सौ.मेघना बोर्डीकर यांनी  आज सोमवारी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली, यावेळी आमदार बोर्डीकरांनी आडगांव परीसरात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशा सुचना  नायब तहसीलदार परेश चौधरी यांना दिल्या.

यावेळी  आमदार मेघना  बोर्डीकर यांच्यासह  भाजपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, माजी तालुकाध्यक्ष प्रल्हादराव दाभाडे, बाबासाहेब  खेत्रे, सरपंच मंचकराव खंडागळे, प्रकाश दाभाडे, सुंदरराव चव्हाण, लिंबाजी खंडागळे, विश्वनाथ राऊत, ज्ञानदेव खंडागळे, कैलास  देशमुख, रमेश  खंडागळे, नारायण  दाभाडे, गोरखनाथ दाभाडे, शेरूभाई पठाण, शंकर दाभाडे, बालकिशन दाभाडे, बबन  गडदे, पांडुरंग गडदे, विजय चव्हाण,  पवनकुमार पाटील, परमेश्वर दाभाडे, जगन्नाथ खंडागळे, मधुकर कवडे, लिंबाजी  कवडे, दिपक ठोके यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या