💥जिंतूर तहसील कार्यालयात मुख्य ध्वजारोहण संपन्न....!


💥तालुक्यात 'हर घर तिरंगा' अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद💥

जिंतूर प्रतिनिधी

जिंतूर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त जिंतूर शहरात व तालुक्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा या कार्यक्रमास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानांची घोषणा केली होती" हर घर तिरंगा" अभियानांच्या मूळ उद्देश देशीवाशी यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाबाबत जागरूकता वाढवणे हा होय.

यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय तहसीलदार श्री सखाराम मांडवगडे यांच्या हस्ते संपन्न झाला तर तालुक्यातील ठिकठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणात ध्वजारोहण संपन्न झाले. त्यामध्ये जिंतूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक श्री दीपक दंतुलवार नगरपरिषद येथे मुख्याधिकारी श्री जाधव,आरोग्य विभागात वैद्यकीय अधीक्षक  श्री चांडगे आणि अनेक ठिकाणी शहरात ध्वजारोहण करण्यात आले. तर तहसील कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणा नंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयी पारितोषिक तहसीलदार श्री मांडवगडे पोलीस निरीक्षक दंतुलवार ,जेष्ठ स्वातंत्र सैनिक अॅड.हरीहरराव देशमुख आदींच्या हस्ते देण्यात आले. तर दैनिक विश्व जगत या दैनिकांचे मान्यवरांचे हस्ते विमोचन करण्यात आले.

यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, पत्रकार आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या