💥परभणी जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढविणार.....!


💥राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी केली घोषणा💥


परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुख यांची बैठक नुकतीच अमरावती येथील हॉटेल राजवाडा येथे पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. बल्लुभाऊ जवंजाळ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. अनिलभाऊ गावंडे, परभणी जिल्हा संपर्क प्रमुख मा. प्रविणभाऊ हेंडवे, परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह मराठवाडा व विदर्भातील प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व जिल्हाप्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या वतीने जिल्हाभरामध्ये केलेल्या जनहितार्थ कामाची माहिती तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीबाबत केलेल्या तयारीची संपूर्ण माहिती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्यासह पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिली त्याचबरोबर पक्षाने परभणी जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवावी अशी विनंती जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी माननीय बच्चुभाऊ कडू यांच्याकडे केली. याच बरोबर या बैठकीत मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्हाप्रमुखांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढविण्याबाबत मत व्यक्त केले तसेच निवडणूक लढविण्याबाबत मा. बच्चुभाऊ कडू यांनी निर्णय घ्यावा व त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल असेही या बैठकीत ठरले.

बैठकीला मार्गदर्शन करताना मा . बच्चुभाऊ कडू यांनी परभणी जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर ताकतीने लढविणार असल्याची घोषणा केली.मा.बच्चुभाऊ कडू यांच्या घोषणेनंतर परभणी जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी कामाला लागले असून जिल्ह्यातील आगामी सर्व जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगर पालिका व महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी उमेदवारांची चाचपणी करण्याचे काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे तसेच लवकरच याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील अशी माहिती जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या