💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मनपा प्रशासन लागले कामाला.....!


💥अहिल्याबाई होळकर नगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सुरुवात💥


परभणी (दि.०७ आगस्ट) - शहरातील एमआयडीसी परिसराला लागून असलेल्या अहिल्याबाई होळकर नगर हे मागील वीस वर्षापूर्वी वसलेली कॉलनी असून ही कॉलनी एन ए लेआऊट झालेली आहे. येथील रहिवाशी बेटरमेंट चार्जेस भरलेले आहेत शिवाय येथील रहिवासी दरवर्षी परभणी शहर महानगरपालिकेला मालमत्ता कर म्हणून घरपट्टी रेगुलर देत असतात असे असतानाही महानगरपालिकेच्या गालथान कारभारामुळे या कॉलनीतील नागरिकांना आज पर्यंत कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत  कॉलनीला जोडणारा मुख्य रस्ता  चिखलाने भरलेला असून परिसरामध्ये नाल्या स्वच्छ न झाल्याने दुर्गंधी पसरली आहे शिवाय या भागामध्ये मागील वर्षभरापासून घंटागाडी येत नाही तसेच ह्या कॉलनीमध्ये लोकांना महानगरपालिकेचे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होत नाही अशा अनेक नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिकांनी परभणी शहर महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी व निवेदने देऊनही कुठल्याही प्रकारची दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. परभणी शहर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाला कंटाळून अहिल्याबाई होळकर नगरातील महिलांनी नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्याकडे लेखी तक्रार करून महानगरपालिका प्रशासना कडे पाठपुरावा करून अहिल्याबाई होळकर नगर मध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती या तक्रारीची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्ट मंडळ व नगरातील नागरिकांच्या वतीने मा. आयुक्त परभणी शहर महानगरपालिका यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले व तात्काळ नागरी सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली होती या निवेदनाची दखल घेत अहिल्याबाई होळकर नगर मध्ये दुसऱ्या दिवशीपासून घंटागाडी सुरु झाली आहे. परिसरातील नाल्यांची साफसफाई सुरू झाली तसेच आज रोजी येथील मुख्य रस्त्यांवर खडीमिश्रित डस्ट टाकून खड्डे बुजवुन रस्ते व्यवस्थित करण्याचे काम परभणी शहर महानगरपालिकेने केले.

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या आक्रमक भूमिकेमुळे न्याय मिळाला असून अहिल्याबाई होळकर नगर मध्ये नागरी सुविधा देण्यास परभणी शहर महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.

आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर नगरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके,शहर चिटणीस वैभव संघई, दीपक कुचे, गोदावरी दीपके, मिनाबाई जाधव, जयश्री पारवे, शामलबाई सदावर्ते, धृपदाबाई  खिल्लारे, प्रजा तुरुकमाने, अनुराधा थोरात, अर्चना मुनेश्वर, कौशल्या कळसे, छाया खांडके यांच्यासह अहिल्याबाई होळकर नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या