💥महागाईचा फटका यावेळेस श्री.गणेश महोत्सवालाही : गणेश भक्तांना यावर्षी बाप्पाच्या मुर्ती मिळणार महाग....!


💥या वर्षी मोठ्या मूर्त्यांना कसलेही बंधन नसल्याने मंडळ कार्यकर्त्यांची मोठ्या मुर्त्यांना मागणी💥 

कच्चा माल,रंग आणि मजुरांचा मेहनताना यात मोठी वाढ झाल्याने बाप्पांच्या मुर्त्या  यंदा 30 ते 50 टक्के महागाने खरेदी कराव्या लागणार आहेत. आधीच महागाईच्या वणव्यात होळपरळणार्या सर्वसामान्यांना बाप्पांच्या मुर्त्या साठी आता भक्तांना जास्तीची पदरमोड करावी लागणार आहे.


या बाबतचा आढावा घेतला आहे आमचे ब्युरो चीफ केदार पाथरकर यांनी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मूर्त्यांचे काम जोमाने सुरू झाले आहे. या वर्षी मोठया मूर्त्यांना कसलेही बंधन नसल्याने मंडळ कार्यकर्त्यांची मोठ्या मूर्त्यांना मागणी आहे गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल यंदा प्रचंड महाग झालाय,प्लास्टर,शाडू माती, काथ्या, विविध प्रकारचे रंग यांचे भाव अक्षरशः गगनाला भिडलेत. परिणामी मजुरीही वाढलीय,या सर्व बाबींचा परिणाम  किमतीवर होणार आहे मूर्ती कारागीर दीपक पल्लये यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यंदा गणेशमूर्ती  30 ते 50 टक्क्यांनी महागणार असल्याचं सांगितल.

काहीही झालं तरी सर्व सामान्य माणूस गणेशमूर्ती खरेदी करणारच कारण गणेशमूर्ती शिवाय गणेशोत्सव हे होऊच शकत नाहीत परिणामी भाविकांना पदरमोड करावीच लागणार असे चित्र आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या