💥सर्वधर्म सदभावना संसदेत घडले सामाजिक एकात्मतेचे दर्शन....!


💥यात सर्वधर्मीयांच्या नागरिकांनी सहभाग नोंदवून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवून आणले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२९ आगष्ट) - शहरातील जामा मस्जितीच्या सभागृहात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता वृध्दिंगत करण्यासाठी जमियते उलमा ए हिंद शाखा जिंतूरच्या वतीने रविवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी 02 वाजता सर्वधर्मीय सद्भावना संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीयांच्या नागरिकांनी सहभाग नोंदवून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जमियते उलमा ए हिंद शाखा जिंतूरच्या वतीने जातीय सलोखा, राष्ट्रभक्ती, राष्ट्राची शांतता आणि अखंडता तसेच राष्ट्रीय एकात्मता वृध्दिंगत करण्यासाठी शहरातील जामा मस्जिद येथे  सदभावना संसदेचे आयोजन करण्यात आले होते. संसदेच्या अध्यक्षस्थानी जमियेत उल्माए हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना तजम्मूल अहेमद खान मिल्ली विराजमान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्रीधर भोंबे, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, डाॅ.इरफान पटेल,डाॅ.निशांत मुंडे, प्रा.बाळासाहेब बुधवंत, एड.कुमार घनसावंत, नगरसेवक शामराव मते, मनोहर डोईफोडे, सालेह चाऊस, डॉ कांगने आदींची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य श्रीधर भोंबे यांनी महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे मात्र सध्या चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे उच्च शिक्षण दर्जेदार विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थी विकासाच्या प्रवाहात येण्यास सक्षम राहत नसल्याची खंत व्यक्त केली. पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी सांगितले की सर्व जाती धर्माचे सण गुण्यागोविंदाने सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावी समाज विघातक घटना कुठे घडत असेल किंवा संशयित व्यक्ती दिसत असेल तर त्वरित पोलिसांना देऊन होणारे अनर्थ टाळावे. याप्रसंगी शाहेद बेग मिर्झा, दलमीर खान, उस्मानखान पठाण, मोहसीन खान पठाण, अब्दुल रहेमान लाडले, अहेमद बागवान, शेख मुखीद, न.प.सालेह चाऊस,जाकेर बेग मिर्झा, कागणे, हाशम भुरी, सह सर्व जाती धर्मातील नागरिकांनी सहभाग घेऊन सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना सिराजोद्दीन नदवी यांनी केले तर प्रास्ताविक मौलाना तजम्मूल यांनी मांडले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या