💥परभणी जिल्हा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख पदावर पुर्णा पंचायत समिती उप सभापती माधवराव कदम यांची नियुक्ती.....!


💥राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव (महाराष्ट्र) संजय मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र बहाल💥

परभणी (दि.१४ आगस्ट) - शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या चाळीस आमदारांच्या बंडखोरी नंतर देखील शिवसेना अभेद्य राहिली या जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने बंडखोरी केली नाही हे विशेष परंतु सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर वगळता बंडखोरांना उघडपणे रस्त्यावर उतरून विरोध देखील कोणी केला नाही जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा गढ समजला जाणाऱ्या पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघितील पुर्णा पंचायत समितीचे उप सभापती माधव कदम व शिवसेनेचे माजी खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव  सुरेश जाधव हे दोन नेते वगळता जिल्ह्यातील कोणीही शिवसेना (शिंदे गट) या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागला नाही या दोन्ही नेत्यांना बंडखोर शिवसेना गटाने जिल्हा प्रमुख घोषीत केले असून शिवसेनेच्या (शिंदे गट) परभणी जिल्हा प्रमूख पदावर पूर्णा पंचायत समितीचे उपसभापती माधवराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख पदावर विशाल कदम तर परभणी जिल्हा शिवसेना (शिंदे) बंडखोर जिल्हा प्रमुख पदावर माधव कदम यांची नियुक्ती नुकतीच झाल्या मुळे आता दोघांच्याही वर्चस्वाच्या लढाईला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार असल्याचे बोलले जात असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना की शिवसेना (शिंदे) गटाचे मजबूत वर्चस्व निर्माण होईल हे तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

दरम्यान राज्यात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांची निवड झाली.शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी पाठिंबा दिला.त्यामुळे शिवसेनेस मोठे खिंडार पडले.त्याचे साद पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले.परभणी जिल्ह्यातील काही नेते व कार्यकर्ते यांनी शिंदे गटास पाठिंबा दिला.त्या पाठोपाठ माजी खासदार ॲड.सूरेश जाधव यांनी औरंगाबाद सभेत शिंदे यांची भेट घेवून पाठिंबा दिला.त्यावेळी शिंदे यांनी आपली परभणी जिल्हा प्रमुख म्हणूण नियूक्ती केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली.परंतू  राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या आदेशाने शिवसेना सचिव (महाराष्ट्र) संजय मोरे ,शिवसेना प्रवक्ते(महाराष्ट्र) किरण पावसकर, मा.सभागृह नेते म.न.पा. ठाणे पांडुरंग दादा पाटील यांच्या हस्ते  परभणी जिल्हा प्रमुख म्हणूण पूर्णा समितीचे उपसभापती कदम यांची शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी पदी नियुक्ती पत्रक देवून निवड करण्यात आली.

दरम्यान स्वच्छ प्रतिमा आणि पंचायत समिती माध्यमातुन ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव असल्यामुळे माधव कदम यांची नियुक्ती नक्कीच पूर्णा, पालम,गंगाखेड या भागात पक्षाची ताकत वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल अशी प्रतिक्रिया कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा शिंदे गटाचे नेते प्रविण देशमुख यांनी व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या