💥महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा...!


💥परभणीतील सावली शासकीय विश्रामगृह येथे रविवार दि.14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता आगमन होणार💥

परभणी (दि.13 आगस्ट) : महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे हे परभणी दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

रविवार, 14 ऑगस्ट,2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथे आगमन होणार आहे. सायं. 6.00 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणीकडे प्रयाण व आगमन. सायं. 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री 8.30 वाजता श्री. आनंद भरोसे यांचे निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व स्वागत समांरभास उपस्थिती. रात्री 9.30 वाजता नगरसेवक श्री. मधुकर गव्हाणे यांच्या निवासस्थानी जातील. रात्री 11.00 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणीकडे प्रयाण, आगमन व मुक्काम करतील.

सोमवार, दि. 15 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 8.55 वाजता सावली शासकीय विश्रामगृह, परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालय, परभणीकडे प्रयाण करतील. सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करतील. सकाळी 9.45 वाजता पोलीस मुख्यालय परभणी येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन करतील. सकाळी 10.15 वाजता श्री. प्रमोद वाकोडकर यांच्या निवासस्थानी जातील. सकाळी 11.00 वाजता श्री. विजय वरपुडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. आणि सकाळी 11.20 वाजता परभणी येथुन औरंगाबादकडे प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या