💥हर घर तिरंगा अभियानंतर्ग माविमच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन....!


◆स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहाने साजरा होणार◆


परभणी (दि.९ आगस्ट) : येथील महिला आर्थिक विकास महामंडळ  परभणी कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्यानिमित्ताने दि. 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंचलित साधन केंद्र  संचलित महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे संपन्न होणार आहेत.


लोकसंचलित साधन केंद्र व महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील सर्व कुंटुंबापर्यंत तिरंगा पोहोचवण्यासाठी जाणीव जागृती करण्यात येत आहे. तसेच लोकसंचलित साधन केंद्र, महिला ग्रामसंघ, शहर स्तर संघ, वस्ती स्तर संघ व निवडक बचत गटाच्या माध्यमातून विविध ठिकाणी तिरंगा ध्वज विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहेत.त्या माध्यमातून घरा-घरा पर्यंत तिरंगा पोहोचवण्यात येत आहे. यामाध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती होत आहे.

💥महिलांची रॅली ;-

हर-घर तिरंगा तसेच समाज प्रबोधनपर जाणीव जागृती करण्या करीता दि. 10 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारक, राजगोपालचारी उद्यान येथे सकाळी 10 वा. बचत गटातील महिलांच्या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राजगोपालचारी उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत महारॅली संपन्न होणार आहे. सहभागी महिला विविध वेषभूषात महारॅली मध्ये उपस्थित राहणार आहेत. यावेळी निवडक उद्योजक महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण करीता निर्धुल चुलचे  वाटप या होणार आहे. महारॅलीमध्ये सर्व महिलांच्या हाती तिरंगा ध्वज असणार आहे.

💥आरोग्य तपासणी :-

दि. 12 रोजी आरोग्य विभागाच्या सहाय्याने ग्रामीण भागातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रावर महिलांची आरोग्य तपासणी व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हिमोग्लोबीन व इतर विविध तपासण्या व त्याबाबतची जाणीव जागृती करण्यात येणार आहे. शेळगाव ता. सोनपेठ, महातपुरी ता. गंगाखेड,  चारठाणा व कौसडी ता. जिंतूर , दैठणा,पिंगळी व जाम ता. परभणी, एरेडेश्वर व ताडकळस ता. पूर्णा येथे किमान 2000 महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे.

💥सांस्कृतिक स्पर्धा,परसबाग लागवड :-

दि.11ऑगस्ट रोजी विविध सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी, मेहंदी व तिरंगी पाक कला  स्पर्धा तसेच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिलांना ताजी फळे,भाज्या व पालेभाज्या मिळाव्यात तसेच त्यांना पोषक आहार घराशेजारी मिळावा याकरिता दि.  8 ते 13 ऑगस्ट या कालावधीत घरो-घरी परसबाग लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

💥सेल्फी विथ तिरंगा :-

दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घर-घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्व कुंटूंबाच्या उपस्थितीत सेल्फी विथ तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी गावा-गावात घरोघरी जावून जाणीव जागृती करण्यात येत आहे.तसेच  दि. 15 ऑगस्ट रोजी गावो-गावी ग्रामपंचायत, शाळा, नगरपालिका, पंचायत समिती येथे बचत गटांच्या माध्यमातून महिला ध्वजारोहणासाठी  उपस्थित राहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या