💥परभणी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या पुर्णा तालुकाध्यक्षपदी शेख शेहजाद शेख इनायतुल्ला यांची निवड..!


💥राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष चंदन बस्वराज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान💥

पुर्णा (दि.२५ आगस्ट) - तालुक्यातील ताडकळस येथील शेख शेहजाद शेख इनायतुल्ला यांची परभणी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडियाच्या पुर्णा तालुकाध्यक्षपदी वसमत रोड परभणी येथील राष्ट्रवादी भवन येथे दिनांक २५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष चंदन बस्वराज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रितेश काळे ,पुर्णा तालुकाध्यक्ष तथा सरपंच ताडकळस गजानन आंबोरे ,सोशल मीडिया परभणी जिल्हाध्यक्ष शाहेद सिद्दिकी ताडकळस ग्रामपंचायत सदस्य बबलु माने यांच्यासह आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या