💥परभणी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन...!


💥सदर रोजगार मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभाग नोंदवावा💥

परभणी (दि.26 आगष्ट) : जिल्ह्यातील सुशिक्षीत बेराजगार युवक- युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या विद्यमाने दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास धुत ट्रान्समिशन, औरंगाबाद, नवकीसान बायोप्लांट, शाखा नांदेड, या उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून त्यांना विविध पदे भरावयाची आहेत.

      सदर रोजगार मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभाग नोंदवावा. सर्वप्रथम www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी करणे. वेबसाईटवरील नोकरी साधक (Job Seeker) या पर्यायावर क्लिक करणे,  युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन login या पर्यायावर क्लिक करणे.  प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करणे. परभणी जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला Parbhani District Pandit Din Dayal Online Job Fair 4 मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायावरील View Details या बटणवर क्लिक केल्यावर मेळाव्यास उपलब्ध रिक्त पदे दिसतील list of Vacancy या बटणावर क्लिक करुन शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. सदर संदेश काळजीपूर्वक वाचा व Ok बटणावर क्लिक करावे, आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी  मेळाव्यास सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452 220074 वर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या