💥रक्तदान करणे ही देशसेवाच - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥राष्ट्रीय खेळाडू माधव माने यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात जिल्हाधिकारी गोयल यांनी केले प्रतिपादन💥

परभणी (दि.12 आगस्ट) :  रक्तदान करणे ही देशसेवाच आहे, असे मत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केले येथील गौरव क्रिडा मंडळाद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह राष्ट्रीय खेळाडून माधव माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्व. बाळासाहेब ठाकरे नगरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी गोयल यांच्याहस्ते झाले. 

यावेळी खासदार संजय जाधव, उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, डॉ. ज्ञानेश्‍वर भाले, सुदाम लाड, संतोष गायकवाड, माधव शिंदे, माणिकराव कदम, अर्जून सामाले, प्रदीप भालेराव आदी उपस्थित होते.

           गौरव क्रिडा मंडळाने आयोजित केलेल्या या शिबीरात एकूण 75 तरुणांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी तरुणांना मार्गदर्शन करतेवेळी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे नमूद केले. दर तीन महिन्यानंतर रक्तदान करावे. त्या संबंधीचा संकल्प सोडावा, रक्तदान करणे ही एकाप्रकारे देशसेवाच आहे, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक कैलास माने, सूत्रसंचालन साहील सुतारे तर आभार शिवम पारवे यांनी मानले. योगेश कदम, ओंकार सवणे, श्रीकांत तमशेटे, दत्ता देशमुख, गजानन सामाले, विवेक डुबे, ऋषी लाड, मंगेश सूर्यवंशी, शुभम लाड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या