💥पूर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन....!


💥उद्घाटन १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता अ.भा.ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.मोहन खेरडेंच्या हस्ते होणार💥

 पूर्णा (दि.०९ आगस्ट) - येथील अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी संचलित स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील  ग्रंथालयशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक १२ ऑगष्ट २०२२ रोजी "  शैक्षणिक व  सार्वजनिक ग्रंथालयाच्या उत्कृष्ट सेवा " या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे  आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय ग्रंथालय संघ,महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथपाल संघ,मुंबई , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड आणि  स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील ग्रंथालयशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता अखिल भारतीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.मोहन खेरडे यांच्या हस्ते होणार असून  कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले हे उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, महाविद्यालयाचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ रामेश्वर पवार, शिक्षण सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे,डॉ. धीरजकुमार कदम, डॉ.एन.बी.दहीभाते,प्राचार्य डॉ.के. राजकुमार हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक व साधन व्यक्ती म्हणून अधिष्ठाता डॉ.वैजयंता पाटील, डॉ.एस.पी.चव्हाण,डॉ.नंदकिशोर मोतेवार,डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ गणेश कुलकर्णी, डॉ.शिवशंकर घुंबरे,डॉ.मिलिंद अनसाने हे मार्गदर्शन करतील. समारोप सत्र डॉ गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून 

माजी आमदार गंगाधर पटणे,  आर.एस बालेकर, बालाजी कातकडे, राम मेकाले, डॉ.विनय पाटील, भास्कर पिंपळकर, सुनील वायाळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार  आहेत. 

चार सत्रात होणाऱ्या या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ग्रंथालय शास्त्राच्या विवीध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी या राष्ट्रीय चर्चासत्रास जास्तीत जास्त संशोधक व अभ्यासकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  चर्चासत्राचे मुख्य प्रवर्तक प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार, प्राचार्य डॉ संतोष कुऱ्हे, समन्वयक डॉ. विलास काळे, भीमराव मानकरे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या