💥चारठाणा येथील गोदरी नदीच्या पुलाची उंची वाढवावी याकरिता आमदार बोर्डीकर यांना दिले निवेदन....!


💥नदीला पुर आल्यास नागरिकांना बस स्थानक व इतर ठिकाणी जाण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावातून गोदरी नदी वाहते त्यामुळे सदर गाव दोन भागांमध्ये विभाजित झालेले आहे. गावातील 50 टक्के लोक वस्ती ही नदीच्या एका बाजूला झालेली आहे. तर नदीच्या दुसऱ्या बाजूला बस स्थानक आरोग्य केंद्र व इतर शासकीय कार्यालय आहेत.

सदरील नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय जुने असून या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात, जास्त प्रमाणात पाऊस आल्याने त्या नदीला पूर येतो. त्यामुळे नागरिकांना बस स्थानक व इतर ठिकाणी जाण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्याचा सामना करत वाट काढावी लागते. तसेच गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सदर पुलाची उंची वाढवण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी आमदार मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री शशिकांत नानासाहेब देशपांडे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या