💥जिंतूर येथे संत भगवान बाबा जयंती निमित्त अभिवादन.....!


💥पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांच्या हस्ते संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत  श्री भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी जिंतूर येथे जय भगवान महासंघाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शहरातील श्री संत भगवान बाबा चौकात जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांच्या हस्ते संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष शामराव बुधवंत, जय भगवान महासंघाचे युवा तालुका अध्यक्ष सोपान पालवे,प्रविण कांदे,बबनराव कुटे,माधवराव घुगे,अतिस ईलग,संतोष घुगे,आसाराम बुधवंत,सुंदरराव घुगे,गणेश घुगे,संदिप बुधवंत, दीपक कुटे यांच्यासह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या