💥कायद्याची योग्य अमलबजावणी झाली तरच महिलांना न्याय मिळतो - ॲड.संध्या काळे


 💥" महिला विषयक कायदे जाणीव जागृती " या विषयावरील परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या💥

पूर्णा (दि.२८ आगष्ट) - कायद्याची योग्य अमलबजावणी झाली तरच महिलांना न्याय मिळू शकतो असे प्रतिपादन पुणे येथील सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता ॲड.संध्या काळे यांनी केले. त्या येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील महिला लैंगिक छळ प्रतिबंधक समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "महिला विषयक कायदे जाणीव जागृती " या विषयावरील परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.


यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे.ए आपल्या देशातील कायद्याच्या तरतुदी खूप पक्या आहेत मात्र अनेकदा योग्य पध्दतीने तपास होत नसल्याने गुन्हेगार निर्दोष सुटतात आणि फिर्यादींना न्याय मिळत नाही. म्हणून फिर्यादींनी योग्यवेळी सक्षम साक्षी पुरावे सादर करुन न्यायासाठी सतत पाठपुरावा केला पाहिजे.असे झाले तर निश्चितच अन्याग्रस्थांना न्याय मिळतो. तेव्हा समाजाचा विश्वास वाढतो आणि गुन्हेगारावर वचक बसतो. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी धाडसी व सतर्क राहीले पाहिजे.आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीतल्या घटना पालक,शिक्षक व जवळच्या व्यक्तींना सांगितल्या तर समस्यांचे निराकरण लवकर होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिला व पुरुषांना लागु असलेल्या अनेक कलमाचे उदाहरणासहित विवेचन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून  वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील वस्त्रशास्त्र विभागाच्या प्रोफेसर डॉ. सुनीता पवार(काळे मॅडम) या उपस्थित होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की मुलींनी जागरुक राहून स्वतःला तपासले पाहिजे. मुलींनी आई वडीलांना डोळ्यासमोर ठेवून वागावे त्यांचा आदर्श आणि सन्मान जतन केला पाहिजे. असे आचरण राहिले तर आपल्या हातून चुका होणार नाहीत.असे विश्वास वाढविणारे विचार त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संस्थापक सचिव प्रोफेसर डॉ. रामेश्वर पवार, शिकागो येथून अनया पवार, पुणे येथील अभियंता प्रथमेश काळे, पायल काळे, डॉ.भीमराव मानकरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत प्रा. सुजाता घन यांच्या स्वागत गीताने झाले. समन्वयक डॉ 

शारदा बंडे यांनी प्रास्ताविक केले तर प्रभारी प्राचार्य डॉ संतोष कुऱ्हे यांनी भुमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सुरेखा भोसले यांनी केले तर आभार प्रा डॉ दिपमाला पाटोदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या