💥जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील भोगाव जवळ भरधाव कारने दुचाकीस्वारास उडवले...!


💥या घपघातात दोन जण गंभीर जखमी : नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात केले दाखल💥

जिंतूर प्रतिनिधी  /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०६ आगस्ट) - जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील भोगाव जवळ कार व दुचाकित झालेल्या अपघात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. सुदैवाने दोन वर्षाच्या चिमुरडीला कसलाही मार लागला नाही सदर घटना दि. 6 ऑगस्ट सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मागील काही दिवसांपासून जिंतूर औंढा महामार्गावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली नेहमीच अपघात होत असतात रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक वाहनधारकांना याचा मोठा फटका बसत आहे..

अशातच भोगाव जवळ दुचाकीस्वार मनोज मोरे शहरातील रुग्णालयात उपचार करून भोगाव गावाकडे निघाले सोबत महिला व लहान मूल घेऊन दुचाकीवरून जात असताना ओढ्याकडून भरधाव येणाऱ्या कार वाहन क्रमांक एम एच 17 ए. जी. 5524 या वाहनाने जोरदार दुचाकीला धडक दिली, यामध्ये दुचाकीवरील मनोज मधुकर मोरे वय 30 वर्ष, भाग्यश्री मोरे वय 25 वर्षे हे दोन जण गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना ग्रामस्थ शेख मुनाफ व इतर नागरिकांनी जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या