💥स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात माजी प्रधानमंत्री राजीव गांधींची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी....!


💥याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला💥

पूर्णा - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी   पवार महाविद्यालयात देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे  यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र  अभिवादन केले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांनीही  माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सद्भावना दिनाच्या निमित्ताने सर्वांना शपथ देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी राजीव गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रभारी प्रा डॉ प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. भारत चापके यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या