💥पुर्णेतील अल्पभुधारक वयोवृध्द शेतकरी महिलेची तलाठ्याशी संगणमत करून नातलगानेच केली आर्थिक फसवणूक...?


💥महिला शेतकरी कमलाबाई परडे यांनी केली जिल्हाधिकारी गोयल यांच्यासह तहसिलदारांकडे लेखी तक्रार💥


पुर्णा (दि.०४ आगस्ट) - येथील पुर्णा शेतशिवारातील पुर्णा नदीपात्रावरील गट नंबर २०७ क्षेत्रफळ १ हेक्टर ८२ आर या सामाईक शेतजमिनीतील हिस्सेदार अल्पभुधारक वयोवृध्द महिला शेतकरी कमलाबाई भ्र.गणपतराव परडे यांच्या नावावर यातील नियमाप्रमाणे ४५.०५ इतकी शेतजमीन असून या सामाईक शेत जमिनीतील अन्य हिस्सेदार रोहिदास बालाराम परडे जे या महिला शेतकरी कमलाबाई परडे यांचे नात्याने दिर असून तक्रारदार कमलाबाई परडे या अशिक्षित व वयोवृध्द असल्यामुळे त्यांचा या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन रोहिदास परडे व अन्य हिस्सेदारांनी या पुर्णा तलाठी सज्जाचे तत्कालीन पुर्व तलाठी रासवे व विद्यमान तलाठी राठौड यांच्याशी आर्थिक हितसंबंध स्थापित करून मागील २००७ ते २०२२ या कालावधीत कोरडा/ओला दुष्काळ नुकसान भरपाई आदींसह विविध शासकीय अनुदान कमलबाई परडे यांच्या संमती शिवाय खोटे संमतीपत्राच्या आधारे मागील बारा तेरा वर्षापासून परस्पर उचलून शासनासह संबंधित वयोवृध्द महिला शेतकरी कमलबाई भ्र.गणपत परडे यांचे देखील आर्थिक मानसिक सोशन करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी संबंधित नातेवाईकांसह तत्कालीन पुर्व तलाठी रासवे व विद्यमान तलाठी तलाठी सज्जा पुर्णा यांच्या विरोधात परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे दि.२३ मे २०२२ रोजी एका निवेदनाव्दारे लेखी तक्रार दाखल केली होती.


वयोवृध्द महिला शेतकरी कमलबाई भभ्र.गणपत परडे यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी गोयल यांनी घटनेची सखोल करण्यासंदर्भात आदेशीत केल्यानंतर तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी दि.२४ जुन २०२२ रोजी पुर्णा तलाठी सज्जाचे तलाठी राठोड यांच्या नावाने जा.क्र.२०२२/संकिर्ण/कावी द्वारे तात्काळ चौकशी करून अहवाल तहसिल कार्यालयात सादर करून सामाईक खातेदार यांना शासकीय अनुदान वाटप करण्यासंबंधीचे नियमाप्रमाणे कारविई करण्याचे आदेश दिले होते परंतु तहसिलदार टेमकर यांनी दिलेल्या चौकशी आदेशाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नसल्याचे निदर्शनास येत असून सदरील चौकशी अहवाल अद्यापही गुलदस्त्यात असल्यामुळे संबंधित वयोवृध्द अल्पभुधारक महिला शेतकरी यांना न्यायासाठी आणखी किती काळ संघर्ष करावा लागेल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे...........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या