💥जिंतूर तालुक्यातील मैनापुरी माळरानावर वृक्षसंवर्धनासाठी जिंतूरकर एकवटले....!


💥श्रमदान व वृक्ष लागवडीच्या मोहिमेत आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील माहिलांची उपस्थिती💥 

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

झाड फाउंडेशनच्या वतीने  जिंतूर तालुक्यातील  मैनापुरी माळरानावर आयोजित श्रमदान व वृक्ष लागवडीच्या मोहिमेत आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील माहिला, आबालवृद्ध नागरिक, गृहरक्षक दल व झाड फाउंडेशनचे झाडकरी यांच्या सहभागातून  वेगवेगळ्या प्रकारची शेकडो उपयुक्त झाडे लावण्यात आली.

यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, पोलिस निरीक्षक दीपक  दंतुलवार, डॉ. सविता वाघमारे, डॉ. गीतांजली कान्हडकर, डॉ. अविनाश चवंडके, डॉ. प्रणिता चवंडके, रंजना भोवे, डॉ. दुर्गादास कानडकर, अनुप सोळंके, डॉ. विक्रम परोहार, डॉ. शोतल थिटे, डॉ. दीपा परिहार, प्राचार्य कैलास मुटकुळे, सुनील भोंबे, विजय चोरडिया, अरुण शहाणे, दत्तात्रय देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, मनीषा वाघमारे, शैलजा बंगाळे, नमिता सोळंके, नितीन बंगाळे, कपिल निकम आदींनी श्रमदानात सहभाग नोंदवला. यावेळी परिसराची साफसफाई झाडे लावली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या