💥राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शैक्षणिक संस्थांनी पायाभूत सुविधा अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करावे...!


💥पायाभूत सुविधा अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ💥

परभणी (दि.18 आगस्ट) : राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविदयालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना शासन निर्णय, दि . 07 ऑक्टोबर 2015 अन्वये कार्यान्वित करण्यात आली आहे. हि योजना सन 2022-23 या वर्षासाठी राबविण्यात येणार असुन, इच्छुक शाळांकडुन अर्ज मागविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावयाची मुदत दि. 31 जुलै, 2022 विहित करण्यात आली होती. परंतु काही शाळांना याची माहिती मिळाली नसल्याने ते प्रस्ताव वेळेत सादर करु शकले नाही. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडे परिपुर्ण प्रस्ताव दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करण्यास शासनाकडुन मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांकडून प्राप्त प्रस्तावाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दि. 07 ऑक्टोबर, 2015 च्या शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक शाळांनी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयकडे सादर दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून छाननी व त्रूटींची पुर्तता करुन 31 सप्टेंबर, 2022 पर्यंत शासनास सदर करण्यात येणार आहे.  दि. 31 ऑगस्ट 2022 नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. असे जिल्हाधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या