💥पुर्णेत भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाल्मिक मित्र मंडळाकडून तिरंगा रॅली संपन्न..!


💥शहरातील कोळीवाडा परिसरात वाल्मिक मित्र मंडळाने हर घर तिरंगा रॅलीचे💥


पुर्णा (दि.१२ आगस्ट) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत पुर्णा शहरातील वाल्मिकी मित्र,मडंळाच्या वतीने आज शुक्रवार दि.१२ आगस्ट रोजी सकाळी ०८-३० वाजेच्या सुमारास तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाल्मिकी मित्र,मडंळाकडून आयोजित तिरंगा रॅलीस परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.


सदरील तिरंगा रॅलीस कोळी वाडा येथील साईबाबा मंदिर परिसरातून सुरूवात करण्यात आली होती परिसरातील नवीआबादी धनगर गली शिवाजी रोड आदी परिसरात काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत आबाल वृध्द महिला शाळकरी विद्यार्थी बाळ गोपाळ तसेच तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत वाल्मिक मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रध्वज तिरंग्याचे वाटपही करण्यात आले सदरील तिरंगा रॅली कार्यक्रमाचे आयोजन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वाल्मिक मित्र मंडळाचे प्रमुख किशोर सुर्यवंशी, यांनी केले होते.


 ही 'तिरंगा रॅली' यशस्वी तुकाराम सोळंके, कोंडीबा भंगे, मोहन सोळंके, नवनाथ रंवदळे,खंडु भंगे,लोभाजी,भिसे,शेख,शरीफ, पठाण,अन्वर, अंकुश मेघमाळे, गंगाधर जगताप,राजु भंगे, नवनाथ जंगले, विश्वनाथ दारकोंडे नागेश सोळंके,श्रीरंग भीसे ,लक्ष्मण भंगे नवनाथ वाळवंटे  उद्धव भंगे यांच्यासह वाल्मिक मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या