💥स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त तिरंगा मानव साखळी व सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रम संपन्न....!


💥मानवतच्या नेताजी सुभाष विद्यालयाच्या  भव्य प्रांगणात  मुलांनी भारताचा नकाशा तयार केला💥


परभणी (दि.09 आगस्ट):- मानवतच्या नेताजी सुभाष विद्यालयाच्या  भव्य प्रांगणात  मुलांनी भारताचा नकाशा तयार केला चित्रकला शिक्षक श्री कौसाईतकर  व श्री मुलगीर  यांनी हा नकाशा आखण्यात विशेष भुमिका पार पाडली.यासाठी विशेष परीश्रम ने.सु.वि. च्या सर्व टीमने, मुख्याध्यापक श्री.नंदकुमार सिसोदिया ,केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांचे नेतृत्वाखाली घेतले. यावेळी केप्राशा मानवत, केजीबीवी मानवत व ने.सु.वि मानवत सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी  शैलेश लाहोटी,  तहसीलदार सारंग चव्हाण,  नायब तहसिलदार नकुल वाघुंडे  मानवत ,पंचायत समिती मानवत गटविकास अधिकारी स्वप्निल पवार यांचे मार्गदर्शनाखाली मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी.आर.रणमाळे  यांनी केले त्यांना टीम बिआरसीचे सदस्य आत्माराम पाटील, राजकुमार गाडे, दत्ता सहाणे, ज्ञानेश्वर जलशिंगे व संतोष पांचाळ यांचे सहकार्य लाभले. शेवटी केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. 


* पोषण वाटिका प्रशिक्षण व रानभाज्या महोत्सव उत्साहात :-

परभणी पंचायत समिती आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी  परभणी येथील कन्या प्रशालेमध्ये पोषण वाटिका प्रशिक्षणासह रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

      यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांनी आहार विषयक उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तर परभणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी हर घर तिरंगा कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन ध्वजसंहितावरील 1 ते 13 बाबीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या