💥पुर्णेत खाजगी दुध डेअरी चालकांकडून भेसळयुक्त निकृष्ट दर्जाच्या दुधाची मनमानी दराने विक्री....!


💥जिएसटीच्या नावावर दुध डेअरी चालकांकडून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक💥 

पुर्णा (दि.२० आगस्ट) - केद्र सरकारने लागू केलेल्या जिएसटी गैर फायदा खेत खाजगी नफेखोर व्यापारी व अन्य खाद्य पदार्थांसह दुध विक्रेत्या डेरी चालकांनी जनसामांन्यांचे आर्थिक सोशन करण्यास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत असून केंद्र सरकारणे खुल्या खाद्य पदार्थांवर तसेच दुधासह दुधापासून बणवल्या जाणाऱ्या पदार्थांवर कुठल्याही प्रकारची जिएसटी लागू केलेली नसतांना संबंधित खाद्य विक्रेते व दुध डेरी चालक जिएसटीच्या नावावर मनमानी दर आकारणी करीत फेसळयुक्त खाद्य पदार्थांसह दुध/दही/तुपाची विक्री करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक फसवणूक होत असतांना जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासन जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मान्यताप्राप्त अधिकृत दुध कंपन्यांच्या पाकीटबंद दुधावर केद्र सरकारणे जिएसटी लावल्यानंतर अधिकृत दुध कंपन्यांकडून बंद पाकीटातील दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपये प्रमाणे अर्धा लिटरच्या दुध पाकीटावर एक रुपया तर एक लिटरच्या पाकीटावर दोन रुपये अश्या प्रकारे दुधाचे दर वाढवण्यात आले परंतु खुल्या खाद्य पदार्थांसह दुध/दही/पनीर सह अन्य पदार्थावर जिएसटी नसतांना खाजगी दुधाच्या डेऱ्या चालवणाऱ्या दुध डेरी चालकांनी जिएसटीच्या नावावर भेसळयुक्त दुधाचे दर प्रतिलिटरला १० रुपये प्रमाणे वाढवून जनसामान्य गोरगरीब जनतेचे चालवलेले आर्थिक सोशन थांबवण्या इतपत प्रशासनासह अन्न औषधी प्रशासन देखील जागृक नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल ना ? खाजगी दुध डेरी चालक दुध ग्राहकांना प्रतिलिटर ७० रुपये प्रमाणे भेसळयुक्त दुधाची विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत आहे तर खाजगी गावरान तुपाची विक्री करणारे तुप विक्रेते भेसळयुक्त तुपाची प्रति किलो ९०० रुपये प्रमाणे तर दह्याची प्रतिलिटर १०० रुपये प्रमाणे विक्री करीत असल्याचे निदर्शनास येत असून जिएसटीच्या नावावर केद्र सरकार/राज्य सरकार सह स्थानिक प्रशासन तसेच खाद्य पदार्थांची विक्री करणारे नफेखोर संधीसाधू दुध डेअरी चालक किराना दुकानदार सुध्दा जनसामान्यांचे आर्थिक सोशन करीत असल्यामुळे देशासह राज्य देखील अराजकतेकडे वाटचाल करीत असून संधीसाधू नफेखोर जिएसटीचा देखील पुरेपूर फायदा घेत असतांना लाचखोर प्रशासनासह लाचखोर अन्न व औषधी प्रशासनातील बेजवाबदार व निकम्मे अधिकारी कर्मचारी मात्र 'ऑल इस वेल' म्हणून कर्तव्य न बजावता शासनाच्या फुकटच्या पगारासह भेसळयुक्त खाद्य पदार्थांच्या जिएसटीच्या नावावर मनमानी दराने विक्री करीत जनसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांकडून हप्त्यापोटी मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या लाचेपोटी देशासह जनसामान्यांशी दगलबाजी करीत असल्याचे निदर्शनास येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या