💥परभणीत चित्ररथाद्वारे 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या जनजागृतीस सुरुवात.....!


💥जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतमध्ये जाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,हर घर तिरंगा आणि ध्वजसंहिता चित्ररथ जागृती करणार💥

परभणी (दि.०७ आगस्ट):- स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेची खेडोपाडी जनजागृती आता एलईडी चित्ररथाद्वारे करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती परभणी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोन्सिकर यांनी दिली आहे.

        जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून तयार करण्यात आलेल्या विविध तीन एलईडी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते जिल्हा परिषदे समोर करण्यात आले. हा चित्ररथ जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतमध्ये जाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, हर घर तिरंगा आणि ध्वजसंहिता आदी विषयाबाबत जाणीव जागृती करणार आहेत.

       चित्ररथाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सिकर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक श्री.साळवी यांच्यासह  अधिकारी- कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

        एलईडी चित्ररथाद्वारे दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत   जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध तयारी करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभाग नोंदवावा. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोन्सिकर यांनी केले आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या