💥राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ऑनलाईन बैठकीत परभणीचे शिवसेना आमदार डॉ.राहुल पाटील आक्रमक...!


💥आमदार डॉ.पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले💥

परभणी (दि.21आगस्ट) - अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, शंखगोगल गाईचा बंदोबस्त करा यासह विविध मागण्या परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत केल्या आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यावर आमदार पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी तेथून मराठवाड्यातील मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला,यावेळी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ.  पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले, परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात शंख गोगलगायमुळे पिके फस्त झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आर्थिक मदत द्यावी तसेच  गोगलगायीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी बेटाअल्डीहाईड नावाचे कीटकनाशक वापरत आहेत परंतु  यामुळे पक्षी देखील मरून पडत आहेत, त्यामुळे यावर संशोधन करण्यासाठी कृषी विद्यापीठाला विशेष अनुदान द्यावे, परभणी जिल्ह्यामध्ये सव्वाशे टक्के पाऊस झाला आहे त्यामुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला गतवर्षी 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त आमदार पाटील यांनी शंभर कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती, त्यातील  50 कोटी रुपये मंजूर झाले,परंतु ती रक्कम अद्यापही विद्यापीठाला दिली नाही त्यामुळे 50 कोटी रुपये तात्काळ द्यावे अशी मागणी देखील यावेळी आमदार पाटील यांनी केली खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी केली. 

*एनडीआरएफच्या निकषात बदल करा :-

राष्ट्रीय आपत्ती निवारणचे निकष 2015 चे असून सध्या महागाई मुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे, त्यामुळे या एनडीआरएफ मदत निकषात बदल करावेत, नुकसानीची माहिती देण्याची 72 तासाची अट रद्द करावी, ग्रामीण भागामध्ये वन्य प्राण्यांमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने शेत कुंपण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये कुंपण करण्यासाठी अनुदान द्यावे ई.मागण्या आ. पाटील यांनी केल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या