💥जिंतूर बस आगारात टायर नसल्यामुळे दहा बसेस जाग्यावर : अनेक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवासी वर्गाचे हाल....!💥वरिष्ठ अधिकान्यांनी या बाबत दखल घेऊन त्वरिल टापरचा पुरवठा करून आगरातील वहातूक सेवा सुरळीत करावी💥

जिंतूर प्रतिनिधी /बी.डी.रामपूरकर

जिंतूर आगारातील बसेस साठी गेल्या दहा बारा दिवसापासून टायरची पुरवठा होत नसल्याने टायरबिना दहा बसेस जिंतूर आगारात जागेवरच उभ्या असून या मुळे जिंतूर आगारातून धावणाऱ्या अनेक फेरया दररोज रद्द होत आहे. या मुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. एसटी च्या वरिष्ठ अधिकान्यांनी या बाबत दखल घेऊन त्वरिल टापरचा पुरवठा करून आगरातील वहातूक सेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशी करत आहे.


जिंतूर आगारात सध्या ४८ बसेस उपलब्ध असून टायर पुरवठा होत नसल्याने गेल्या दहा दिवसापासून दहा बसेस आगारात जागेवरच उभ्या आहेत ३८ बसेस रस्त्यावर धावत आहे एकदम दहा बसेस कमि झाल्याने नियोजित फेऱ्या पुर्ण करणे शक्य होत नाही, फेरी मारण्यास बस उपलब्ध होत नसल्याने अनेक चालक वाहक  ही बसून रहातात ईच्छा नसताना चालक वाहकांना सुट्टी घ्यावी लागते. नेहमी तिसऱ्या दिवशी टायरचा पुरवठा होतो. पण सध्या दहा ते बारा दिवस लोटले तरी टायर पुरवठा झाला नाही. म्हणून वरिल परिस्थिती निर्माण झाली आहे. या दहा बसेस जागेवर उभ्या असल्याने चालक ,वाहक व एसटी आर्थिक नुकसान होतेच शिवाय प्रवाशांचे ही हाल होत आहे. एसटी प्रवाशांची पुर्णपणे सोय करत नसल्यामुळे काही खाजगी वहान धारक बसस्थानक च्या आवारातच आपले वहान उभे करून प्रवाशी भरून नेत असताना दीसतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या