💥परभणी जिल्हा परिषदेचा युनानी दवाखाना अनाधिकृतपणे महानगरपालिका क्षेत्रात कसा चौकशी करून कारवाई करा..!


💥पाथरा या गावात दवाखाना हलवण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी💥

परभणी (दि.२२ आगस्ट) - मागील २० ते २५ वर्षांपासून परभणी शहरातील युसूफ कॉलनी येथे जिल्हा परिषदेचा युनानी दवाखाना आहे. जिल्हा परिषद ही स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था असून जिल्हयातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची असते. जिल्हा परिषदेला आपले ग्रामीण भागातील कार्यक्षेत्र सोडुन शहरी भागामध्ये आरोग्य सुविधा व इतर कुठल्याही शासकीय योजना राबविता येत नाहीत. शहरी भागासाठी महानगरपालिका व नगरपालिका अशी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था यंत्रणा अस्तित्वात असताना जिल्हापरिषदेने आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन नियबाहय पध्दतीने ग्रामीण भागातला युनानी दवाखाना परभणी शहरात महानगरपालिका क्षेत्रात कसा सुरू ठेवला आणि हे कृत्य पुर्णत : नियमाचे उल्लंघन व ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शासकीय निधीचा गैरवापर आहे.


परभणी शहरातील युसुफ कॉलनी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या युनानी दवाखान्यात एक डॉक्टर दोन फार्मासिस्ट व दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम करत आहेत यांचे काम महानगरपालिका क्षेत्रात असुन या कर्मचाऱ्यांचे वेतन जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत होते हे पुर्णतः नियमबाहय आहे.

शहरांमध्ये अनेक छोटे मोठे खाजगी व सरकारी आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणा असतानाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेची यंत्र सामुग्री व सुविधा शहरी भागात वापरल्या जातात एकीकडे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था डबघाईला आलेली असतांना शहरी भागात दवाखाना सुरु आहे हा प्रकार संतापजनक आहे.

महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या युनानी दवाखान्याची तात्काळ चौकशो करून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचा शासकीय निधी शहरी भागात वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधित दवाखाना ग्रामीण भाग असलेल्या परभणी तालुक्यातील पाथरा येथे तात्काळ स्थलांतरित करावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली आहे मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी श्री गीते यांनी स्वीकारले. 

युनानी वैद्यकीय पध्दतीचा अवलंब जास्तीत जास्त प्रमाणात मुस्लिम धर्मीय करतात. परभणी तालुक्यामध्ये पाथरा हे मुस्लिमबहुल गाव असून तेथे जिल्हा परिषदेचे कुठलीही आरोग्य व्यवस्था कार्यरत नाही असेही या निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख सय्यद मुस्तफा, शहर चिटणीस वैभव सांगई, शेख अफसर, शेख अलीम, नारायण गरुड, सय्यद इसाक, शिवा गरुड, शेख सरफराज, शेख नवीन, शेख जुबेर, शेख अमजद, शेख अजगर, शेख आसिफ, इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या