💥महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस....!💥अशी शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे💥

परभणी (दि.08 आगस्ट) : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते या पदावर विधानपरिषद सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली आहे.

         महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींना शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी सोमवारी एक लेखी शिफारस पत्र पाठवले. त्याद्वारे, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर नियुक्ती करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपणास अर्थात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. त्यानुसार आपण महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते या पदावर विधान परिषद सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस करीत आहोत, असे ठाकरे यांनी या पत्राद्वारे म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या