💥स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त महिलांची आरोग्य तपासणी व जाणीव जागृती कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद....!


💥यामध्ये जवळपास 2200 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, शुगर,बीपी,कॉलेस्ट्रॉलसह अन्य तपासण्या करण्यात आल्या💥

परभणी (दि.12 आगस्ट) : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' निमित्त 12 ऑगस्ट 2022 रोजी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 8 लोक संचलित साधन केंद्राच्या माध्यमातून महिला स्वयं सहायता बचत गटांची महिला आरोग्य तपासणी व जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल  यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले या करिता 9 ठिकाणी आरोग्य तपासणी व जाणीव जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

यामध्ये सुमारे जवळपास 2200 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, शुगर, बीपी, कॉलेस्ट्रॉल व इतर तपासण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच महिलांच्या आरोग्य बाबत सविस्तर आरोग्य विभागामार्फत व उपस्थित मान्यवर मार्फत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या आरोग्याची सध्य स्थीती मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिने तसेच महिलांच्या आरोग्यात सुधारणा होण्याच्या हेतूने महिलाना त्यांच्या आरोग्याची सध्यस्थिती समझावी व महिलांचे आरोग्य सुधारावे महिलांनी आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व सकस आहाराचे महत्व महिलांना समजण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल  यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


            सर्वोदय लोक संचलीत साधन केंद्र सोनपेठ तालुका अंतर्गत शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले. जनकल्याणी लोक संचलित साधन केंद्र, गंगाखेड तालुक्यात महातपुरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले. एकता लोक संचलित साधन केंद्र जिंतूर तालुक्यातील चारठाणा व कौसडी या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले. आकांक्षा लोक संचलीत साधन केंद्र परभणी तालुक्यातील जांब या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले. प्रगती लोक संचलित साधन केंद्र परभणी तालुक्यातील पिंगळी व दैठणा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले. उत्कर्ष लोक संचलित साधन केंद्र ताडकळस पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले. व संघर्ष लोक संचलित साधन केंद्र पूर्णा तालुक्यातील यरंडेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजन करण्यात आले.


       माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे म्हणाले की, बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी संघटीत होवून गावोगावी 100 टक्के महिलांचे आरोग्य तपासणी करुन घ्यावी व महिलांना व महिलांच्या आरोग्य विषयी भेडसवणारे प्रश्न मार्गी लावावेत सकस आहार, ताज्या फळभाज्या, पालेभाज्या तसेच परस बागेच्या माध्यमातून खाण्याविषयी घरोघरी परसबाग लागवडचे आवाहन केले. त्याच बरोबर घरोघरी तिरंगा मोहीम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्याचे आवाहन केले. दर 3 ते 6 महिन्याला आरोग्याची पुर्ण तपासणी व आवश्यकतेनुसार आहारात बदल हिमोग्लोबिन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक असल्याचे नमूद केले.  विविध ठिकाणी आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य बाबत जाणीवजागृती करिता सविस्तर मार्गदर्शन केले. 

            आरोग्य तपासणी व जाणीव जागृती बरोबरच याच दिवशी परसबाग किट वाटप , तिरंगा पाक कला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, मेहंदी स्पर्धा, तिरंगा विक्री,  रानभाज्या व त्यांचे महत्व अशा विवध कार्यक्रमाचे आयोजन लोक संचलीत साधन केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले.  कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), प्रथामिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य विभागाची संबधित तपासणी यंत्रणा, तालुका आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य अधिकारी, व मविमचे जिल्हा कार्यालय परभणीतील सर्व अधिकारी- कर्मचारी तसेच सर्व लोक संचलित साधन केंद्राचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारणी मंडळ सर्व व्यवस्थापक, लेखापाल,सर्व सहयोगिनी यांच्यासह मोठया संख्येने महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची यशस्वी करण्याकरिता सर्व लोक संचलीत साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या