💥परभणी जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय प्रथम...!


💥यामध्ये सेलू तालुक्यातून प्राथमिक गटातून जवळपास 10 संघांनी सहभाग घेतला होता💥

परभणी/सेलू - (दि.13 आगस्ट) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काल दि 12 ऑगस्ट रोजी परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्यावतीने आयोजित केलेल्या  समूह नृत्य स्पर्धेत सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाने प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय,नगर परिषद,गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या वतीने आधी तालुकास्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये सेलू तालुक्यातून प्राथमिक गटातून जवळपास 10 संघांनी सहभाग घेतला होता.त्या स्पर्धेत देखील के बा विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला होता.काल दि 12 रोजी परभणी येथे अक्षदा मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या यातही के बा विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे." जलवा तेरा जलवा " या देशभक्तीपर गीतावर या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.या संघात पार्थ पांडुरंग पाटणकर, कुंदन नरेश पाटील, 

नंदकिशोर धनराज सिकची,

शेख मुफीस शेख तौफिक,

 पवन बाबासाहेब खरात,

 एकता रामदास गायकवाड 

 निकिता अनंता डासाळकर,

श्रुती अशोक आव्हाडे,

अपेक्षा किशन साखरे,

 शेख मुस्कान शेख जैनोद्दिन,

 समीक्षा संतोष फटके,

 समीक्षा सोनाजी सोळंके,

 प्रणाली दीपक मुळे, 

 करुणा अनिल खनपटे,

 श्रद्धा कैलास बोराडे,

 तनिशा विलास घोडे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

मार्गदर्शक शिक्षिका म्हणून शुभांगी भाग्यवंत, कीर्ती कुलकर्णी यांनी काम पाहिले.

या यशाबद्दल विजयी संघाचे के बा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद जोशी,उपाध्यक्ष ऍड.एल.एम.सुभेदार,सचिव महेश खारकर,मुख्याध्यापक पी एस कौसडीकर,मुख्याध्यापक सुभाष नावकर,सर्व शिक्षक कर्मचारी आदींसह सर्व संस्थाचालकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या