💥'हर घर तिरंगा' या राष्ट्रीय उपक्रमासाठी इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनचा ही पुढाकार...!


💥इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी वडदकर यांच्याकडे २ हजारांचा धनादेश सुपुर्द💥


भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना,'हर घर तिरंगा' हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यासाठी परभणी चे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन नविदिल्ली च्या परभणी जिल्हा शाखेतर्फे " हर घर तिरंगा " अभियानांतर्गत सहभाग घेऊन घरोघरी तिरंगा झेंडा लावण्यासाठी दोन हजार रुपयांचा निधी परभणी चे निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर यांचेकडे आज दि.५ ऑगस्ट २०२२ रोजी सुपुर्द केला आहे.

इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन चे परभणी जिल्हा अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मदन (बापु) कोल्हे, मिडिया चिफ देवानंद वाकळे , हिंगोली जिल्हाध्यक्ष उत्तम धायजे,फोटो ग्राफर अध्यक्ष, संजय घनसांवत, परभणी तालुका अध्यक्ष अ.रहीम, परभणी शहर महानगरपालिका अध्यक्ष मयुर मोरे (देशमुख) यांचे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमात योगदान लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या