💥भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमीत्त चित्र प्रदर्शनीचे आयोजन...!


💥या चित्र प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन💥


परभणी (दि.14 आगस्ट) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त येथील कल्याण मंडपम येथे चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या चित्र प्रदर्शनीचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.


यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार, उपायुक्त रणजित पाटील, स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण मकरंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार देशभर 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका दिवस म्हणुन साजरा करण्यात येत आहे. 75 वर्षांपूर्वी 14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या एक दिवस आधी दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी दिन’ म्हणून स्मरणात ठेवला जाणार आहे. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही आपणांस दिसून येतो. याचे स्मरण राहवे यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त आज हे चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उदघाटन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने येथील कल्याण मंडपम येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळी स्पर्धेचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उदघाटन केले. या स्पर्धेत अत्यंत प्रतिभावान रांगोळी कलाकारांनी स्पर्धेत भाग घेत रांगोळीतून आपली आकर्षक कला सादर केली. 
यावेळी मनपा आयुक्त देविदास पवार, उपायुक्त रणजित पाटील, स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण मकरंग यांच्यासह  अधिकारी-कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक यांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या