💥पुर्णा तालुक्यात जिएसटीच्या नावावर खुल्या दुधाची मनमानी दरवाढ...!


💥शहरासह ग्रामीण भागात चालणाऱ्या खाजगी दुधडेऱ्यांमध्ये भेसळयुक्त दुध विक्री केल्या जाते ७० रुपये प्रतिलीटर💥

पुर्णा (दि.११ आगस्ट) - केंद्रातील मोदी सरकारणे लागू केलेल्या जिएसपटीचा गैरफायदा घेत रोजच्या जिवनातील अत्यावश्यक खुल्या खाद्य पदार्थांची नियमबाह्य पध्दतीने मनमानी दराने विक्री करून सर्वसामान्य जनतेची आर्थिक लुबाडणूक करण्याचे गंभीर प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत असून विक्रेत्यांनी मनमानी पध्दतीने ठरवलेले दर देऊनही ग्राहकांना दुध/दही/तुप आदीं भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री करीत त्यांचे आर्थिक सोशन करण्यात येत असतांना जिल्ह्यातील अन्न भेसळ विभागाचे लाचखोर अधिकारी/कर्मचारी जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेऊन भेसळयुक्त खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना अभय देत असल्याचे दिसत आहे.


पुर्णा तालुक्यात तब्बल ९९ गाव खेड्यांचा समावेश असून यातील अनेक गावातील दुध उत्पादक शेतकरी आपल्याकडील दुध शहरासह ग्रामीण भागातील खाजगी दुधडेअरी वाल्यांना प्रतिलिटर ५०/५५ रुपये प्रमाणे विक्री करीत असतात याच दुधात पुन्हा पाण्यासह दुध पावडर मिश्रीत करून हे भेसळयुक्त खुले दुध संबंधित दुधडेरी चालक सर्वसामान्य ग्राहकांना जिएसटी मुळे भाववाढ झाल्याचे कारण दाखवून ७० रुपये प्रतिलिटर प्रमाणे विक्री करीत असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वर्गाची अक्षरशः आर्थिक लुबाडणूक तर होतच आहे याशिवाय दुध डेअरी चालकांना त्यांच्या मनाप्रमाणे दर देऊन देखील दुध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना भेसळयुक्त दुधाची विक्री करीत त्यांच्यासह कुटुंबातील लहाण बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार देखील होत असल्याचे निदर्शनास येत असून या गंभीर प्रकाराकडे जिल्ह्यातील अन्न भेसळ विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या