💥परभणी महानगर पालिकेतील कर्मचार्‍यांचे उद्या दि.३० आगष्ट पासून कामबंद आंदोलन....!


💥सातवा वेतन आयोगासह 16 मागण्यांसाठी करणार कर्मचारी आंदोलन💥

 परभणी (दि.२९ आगष्ट) : महानगरपालिकेंतर्गत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, आकृती बंधातील मंजूर रिक्त पदांवर कर्मचार्‍यांचा समावेश करावा यासह एकूण 16 मागण्यांकरीता महानगरपालिकेंतर्गत सफाई कर्मचारी व अन्य कर्मचारी मंगळवार दि.30 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करणार आहेत.

           संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड व सचिव के.के. भारसाखळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले आहे. त्याद्वारे, शासनाने मंजूरी देवूनसुध्दा मनपा कर्मचार्‍यांना अद्याप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. त्यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन केले, संप केला, लेखी निवेदने सादर केली. परंतु, आश्‍वासनापलीकडे काहीही मिळाले नाही, अशी खंत व्यक्त केली. महानगरपालिका प्रशासनाने यासह अन्य प्रश्‍नांकडेसुध्दा सातत्याने दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्‍न चिघळले आहेत. कर्मचार्‍यांवर सातत्याने अन्याय होतो आहे, असे स्पष्ट करीत नाईलाजास्तव सणासुदीच्या काळात कामबंद आंदोलन करावे लागत आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या