💥परभणी येथे आयोजित रानभाज्या महोत्सवात शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद.....!


💥या कार्यक्रमाचे उद्घाटन विस्तार कृषी विद्यावेता तथा व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या हस्ते करण्यात आले💥

परभणी (दि.११ आगस्ट) - कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी तसेच कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व. ना. म. कृ. वि. परभणी यांचे संयुक्त विद्यमाने परभणी व  पूर्णा तालुक्यांनी दिनांक 9/रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटन विस्तार कृषी विद्यावेता  तथा व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,परभणी डॉ. गजानन गडदे तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा परभणी श्री. विजय लोखंडे आणि श्री. प्रभाकर बनसावडे उपप्रकल्प संचालक आत्मा परभणी यांचे हस्ते करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी परभणी श्री. भगवान कच्छवे आणि तालुका कृषी अधिकारी पूर्णा श्री. तांबिले यांच्या मार्गदर्शनाखाली हा रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले दोन्ही तालुक्यातील एकूण बारा रानभाज्या स्टॉल उभारण्यात आले होते, यामध्ये परभणी तालुक्यातील लक्ष्मी देवी महिला शेतकरी बचत गट असोला, श्री. चक्रधर स्वामी शेतकरी गट खानापूर, वसुंधरा महिला शेतकरी बचत गट असोला, धनसंचय ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड रहाटी, शिवराजे व राजमाता जिजाऊ महिला शेतकरी गट जास्तीत जास्त महिला शेतकरी गटांची उपस्थिती होती तसेच पूर्णा तालुक्यातील ओंकार शेतकरी बचत गट माखणी व श्री. जनार्दन आवरगंड माखणी आणि श्री. पंडितराव थोरात खानापूर या शेतकऱ्यांनी भरपूर रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रीसाठी स्टॉलमध्ये ठेवल्या व सर्व प्रकारच्या रानभाज्यांची ओळख स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस करून देण्यात आली, त्र्यंबकराव चापके कातनेश्वर तसेच भगवान रेनगडे  कौडगाव, यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या जसे तांदूळ कुंद्रा, वावडिंग, तरोटा, आघाडा, केना, अंबाडी, करटोली, घोळ भाजी विक्रीसाठी आणल्या होत्या या कार्यक्रमास  सर्व मंडळ कृषी अधिकारी श्री. विजयकुमार संघई, प्रशांत ढोके देशमुख परसोडे श्री. कैलास गायकवाड  कृषी सहाय्यक श्री. बबन राठोड व महिला कर्मचारी श्रीमती. स्वयंप्रभा चव्हाण, अनुराधा मस्के, आणि स्वाती शिंदे यांच्यासह सर्व कृषी सहायकांनी प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी तालुक्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. रमेश इकर, श्री. रेंगे पी. पी. सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक परभणी श्रीमती. स्वाती घोडके, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पूर्णा श्री. विलास जोशी व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक  रविकुमार माने यांनी परिश्रम घेतले डॉ. गजानन गडदे आणि श्री. लोखंडे यांनी स्टॉल धारक शेतकऱ्यांना तसेच स्टॉलला भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना रानभाज्यांविषयी सविस्तर माहिती दिली, आणि रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले, श्रीमती. स्वाती घोडके आणि श्रीमती. स्वयंप्रभा चव्हाण या दोघींनी रांगोळी द्वारे वेगवेगळ्या रानभाज्यांचे चित्र रेखाटून कार्यक्रमाची शोभा वाढवली, दोन दिवस संततधार पाऊस चालू असताना देखील रानभाज्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या