💥महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी सचिन रायपत्रीवार तर कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब रामपूरकर....!


💥या प्रवासी महासंघाच्या माध्यमातून प्रवाशाच्या सुविधा देण्यासाठी हा प्रवासी महासंघ काम करत राहणार💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या बैठकीत राज्याचे अध्यक्ष रणजित गौड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष के.डी.वर्मा,महिला प्रतिनिधी सौ जयश्री देशपांडे यांनी जिंतूर तालुका कार्यकारिणीला मान्यता देऊन तालुकाध्यक्ष पदी सचिन रायपत्रीवार तर कार्याध्यक्ष पदी बाळासाहेब रामपूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. 

       या प्रवासी महासंघाच्या माध्यमातून प्रवाशाच्या सुविधा देण्यासाठी हा प्रवासी महासंघ काम करत राहणार या साठी जिंतूर येथील कार्यकारणी जाहीर करण्यात आली पुढील कार्यकारणी पदी सचिव एड.पंकज तिवारी, कोषाध्यक्ष भागवत चव्हाण, उपाध्यक्ष महेश देशमुख, संघटक सुभाष राठोड, सह वाल्मिक वैष्णव, सह सचिव संदीप माहुरकर, महिला सदस्य सौ शैला कुलथे, सौ निर्मला बांडे, तर शिवाजी अंभोरे, संदीप डहाळे, आदींना नियुक्ती देण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या