💥अखंड हिंदुस्थान दिनी चिखली येथे जिल्हास्तरिय दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न....!


💥तिरंग्याचा मान राखणे सर्वांची जबाबदारी : आमदार श्वेताताई महाले💥

✍️मोहन चौकेकर 

चिखली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ता.१४ ऑगस्ट रोजी  अखंड हिंदुस्थान दिनाचे औचित्य साधून सामूहिक देशभक्तीपर गीत व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श जीवन मित्र मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.अर्चना आंबेकर यांच्या संकल्पनेतून व इतर आठ संस्थांच्या सयुक्त विद्यमाने मौनीबाबा संस्थान येथे आयोजीत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे तालुका संघचालक अरविंद असोलकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये आ.श्वेता महाले यांची उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांत सह मंत्री विद्या भारतीचे रामेश्वर कुटे  हे होते. मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, माजी प्राचार्य रमेश सराफ, माजी प्राचार्य विष्णुदत्त त्रिवेदी आणि गोशाळा संरक्षक गजानन महाराज सरस्वती, पेठ आणि आदित्यभैया पाटील, केळवद  आदी उपस्थित होते.

यावेळी रांगोळीतून तिरंगा ध्वजाच्या स्वरूपात अखंड भारताचा नकाशा रेखाटण्यात आला व त्यावर दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते रामेश्वर कुटे यांनी अखंड भारताचा इतिहास विशद करून फाळणीच्या पूर्वीचा इतिहास सांगितला तसेच आतापर्यंत अनेक वेळा भारताची फाळणी झाली तरी आजही भारत आपल्या प्राचीन संस्कृतीच्या बळावर जगात महासत्ता बनत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ.श्वेताताई महाले म्हणाल्या की,  तिरंग्याचा मान राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  यावेळी त्यांनी चिखलीकरांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आयोजक प्रा. डॉ अर्चना आंबेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली व या वेळी बोलताना त्यांनी सांगितले स्वातंत्र्यवीर विनायक  सावरकर यांचा संदेश भारत देशाला सदैव अखंड हिंदुस्थानचे स्मरण देत राहिल. या कार्यक्रमाला अखिल भारतीय विध्यार्थी परिषद , संत गजानन महाराज भक्त मंडळ , गजानन महाराज सेवा समिती , चिखली संस्कार भारती शाखा चिखली , विद्याभारती शाखा चिखली , इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा चिखली , समर्थ भारत केंद्र यांनी आयोजनात पुढाकार घेतला होता तर या दीपोत्सवाला परिसरातील अनेक नागरिक व राष्ट्रप्रेमी जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलकांत आवटी यांनी तर आभार प्रदर्शन महेश वाधवानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल गणात्रा,  गजानन घाडगे पाटील,  संजय लाहोटी,विजयकुमार मेहेत्रे,  शिवनारायण गुप्ता, डॉ रामेश्वर दळवी,  डॉ काळे,  निलेश जैन-महावीर मेडिकल;  प्रा. सुनील काकडे , सौ ज्योतीताई भवर, सौ गायत्रीताई जोशी, सौ मोनिकाताई व्यवहारे, सौ.उमाताई वरणगावकर,  सौ रूपा गणात्रा, कैलास शर्मा, सुनील मोडेकर, गजानन हिंगे, रेणुकादास मुळे, दत्ता महाले, वैभव भागवतकर, संतोष अग्रवाल,  भारत दानवे, राहुल पवार, अनिकेत दांदडे, गणेश अंभोरे या सर्वांनी परिश्रम घेतले. सुरेश दत्तात्रय सावजी-अध्यक्ष श्रीसंत मौनीबाबा संस्थान, प्राचार्य समाधान शेळके-आदर्श विद्यालय यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.

प्रसिद्ध कलाकार गणेश अंभोरे यांनी अखंड हिंदुस्तानचा नकाशा जमिनीवर साकारला आणि अमृता शिवनारायण गुप्ता, उदय शिवनारायण गुप्ता आणि धारा सुभाष सुरसे या तीन विद्यार्थ्यांनी  तिरंग्याचे रंग सुरेखपणे भरून अखंड हिंदुस्तान नकाशाला जिवंत व आकर्षक स्वरूपात साकारले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या