💥योगेश शिक्षक बनून समाजाची सेवा करा - परम पूज्य स्वामी आनंद देव जी महाराज


💥भारत स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रभारी शेफ सर यांच्या प्रयाग कन्स्ट्रक्शन येथे आयोजित कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते💥

जिंतूर प्रतिनिधी   /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर येथील पतंजली योग समिती तर्फे हरिद्वार येथील परमपूज्य स्वामी आनंद देव जी महाराज यांनी जिंतूर येथे भेट देऊन पतंजली योग समिती व त्यांच्या पाचही समीती तिच्या कार्यकारणी सदस्य पदाधिकारी व योगशिक्षक यांना योग का करावा योग करून योगशिक्षक बनून  योगाद्वारे समाजाची सेवा करावी असे मार्गदर्शन पर बोलताना त्यांनी व्यक्त केली व ते पुढेही अशी म्हणाली की योग हा सर्व स्तरातील लोकांसाठी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रभारी शेफ सर यांच्या प्रयाग कन्स्ट्रक्शन येथे आयोजित कार्यक्रमात स्वामीजी बोलत होते या कार्यक्रमास जिल्हा कोषाध्यक्ष वसंतराव देशमुख , जिल्हा संघटन मंत्री यादवराव साखरे, तालुका प्रभारी उद्धव देशमुख, किसान तालुका प्रभारी लखुजी जाधव, महिला तालुका प्रभारी जाधव,सौ. दराडे ,सौ डॉक्टर सविता वाघमारे ,सौ मीनाताई भोंबे, केंद्रे, पुरुषोत्तम अंभोरे ,भुजंग देवकर, योगशिक्षक बाळासाहेब रामपूरकर आधी पाचही समित्यांचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमांच्या सुरुवातीस स्वामीजी व प्रमुख व्यक्तींच्या सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मीडिया जिल्हा प्रभारी श्री गजानन चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन भारत स्वाभिमान चे जिल्हा प्रभारी श्री बडगुजर सर यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या