💥पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमीत्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न...!


💥महाबोधी चॅनलचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदिप नन्नवरे यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण💥

पुर्णा (दि.१३ आगस्ट) - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आज शनिवार दि.१३ आगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमीत्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाबोधी न्यूज चॅनलच्या माध्यमातून शोषित पीडित वंचित अन्याग्रस्त यांच्या न्याय प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणारे पत्रकार प्रदिप नन्नवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनील मोरलवार व त्यांचे सहकारी प्रशांत बोकारे,भानुदास भोसले,सुधाकर राठोड मनोहर आळणे शीतल मधेवर,राहुल बरदाले,खुशाल किरडे पाटील,अशोक वाघ,शेख समी आदींची उपस्थिती होती.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या